ETV Bharat / sitara

'कलंक'चं 'घर मोहे परदेसीया' गाणं प्रदर्शित, पाहा आलिया-माधुरीची जुगलबंदी - karan johar

'घर मोहे परदेसीया' गाण्याचा दमदार टीजर आधीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यामुळे आज गाणं रिलीज होताच यावर चाहत्यांच्या लाईक्सचा पाऊस पडला आहे. श्रेया घोषाल आणि वैशाली भैसने-माडे यांच्या दमदार आवाजातील गाण्यावर आलिया भट्ट आणि माधुरी दिक्षीत यांची अप्रतिम जुगलबंदी पाहायला मिळते.

'कलंक'चं 'घर मोहे परदेसीया' गाणं प्रदर्शित
author img

By

Published : Mar 18, 2019, 6:00 PM IST

मुंबई - दिग्दर्शक करण जोहरच्या 'कलंक' चित्रपटाची बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकही फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आलाय. या टीजरमध्ये चित्रपटातील सर्व कलाकारांची दमदार झलक पाहायला मिळाली. या चित्रपटाचा ट्रेलरही लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचं पहिलं गाणं 'घर मोहे परदेसीया' हे रिलीज करण्यात आलं आहे.

'घर मोहे परदेसीया' गाण्याचा दमदार टीजर आधीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यामुळे आज गाणं रिलीज होताच यावर चाहत्यांच्या लाईक्सचा पाऊस पडला आहे. श्रेया घोषाल आणि वैशाली भैसने-माडे यांच्या दमदार आवाजातील गाण्यावर आलिया भट्ट आणि माधुरी दिक्षीत यांची अप्रतिम जुगलबंदी पाहायला मिळते.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

वरूण धवन याचीही खास झलक या गाण्यात पाहायला मिळते. आलियाच्या अभिनयाप्रमाणेच तिचे कथ्थक नृत्यही प्रेक्षकांवर भूरळ पाडत आहे. माधुरी दिक्षितचेही दमदार नृत्य या गाण्यात पाहायला मिळते. त्यामुळे या दोघींचीही जुगलबंदी असलेले हे गाणे सोशल मीडियावर हिट होत आहे.

'कलंक' चित्रपटात वरूण धवन, सिद्धार्थ रॉय कपूर, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट, संजय दत्त हे सर्व या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. अद्याप या चित्रपटाची कथा गुलदस्त्यात असली तरी, प्रेक्षकांना ट्रेलरची उत्कंठा आहे. १७ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:

kalank first song ghar mohe pardesiya release

'कलंक'चं 'घर मोहे परदेसीया' गाणं प्रदर्शित, पाहा आलिया-माधुरीची जुगलबंदी

मुंबई - दिग्दर्शक करण जोहरच्या 'कलंक' चित्रपटाची बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकही फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आलाय. या टीजरमध्ये चित्रपटातील सर्व कलाकारांची दमदार झलक पाहायला मिळाली. या चित्रपटाचा ट्रेलरही लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचं पहिलं गाणं 'घर मोहे परदेसीया' हे रिलीज करण्यात आलं आहे.

'घर मोहे परदेसीया' गाण्याचा दमदार टीजर आधीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यामुळे आज गाणं रिलीज होताच यावर चाहत्यांच्या लाईक्सचा पाऊस पडला आहे. श्रेया घोषाल आणि वैशाली भैसने-माडे यांच्या दमदार आवाजातील गाण्यावर आलिया भट्ट आणि माधुरी दिक्षीत यांची अप्रतिम जुगलबंदी पाहायला मिळते.

वरूण धवन याचीही खास झलक या गाण्यात पाहायला मिळते. आलियाच्या अभिनयाप्रमाणेच तिचे कथ्थक नृत्यही प्रेक्षकांवर भूरळ पाडत आहे. माधुरी दिक्षितचेही दमदार नृत्य या गाण्यात पाहायला मिळते. त्यामुळे या दोघींचीही जुगलबंदी असलेले हे गाणे सोशल मीडियावर हिट होत आहे.

'कलंक' चित्रपटात वरूण धवन, सिद्घार्थ रॉय कपूर, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट, संजय दत्त हे सर्व या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. अद्याप या चित्रपटाची कथा गुलदस्त्यात असली तरी, प्रेक्षकांना ट्रेलरची उत्कंठा आहे. १७ एप्रिलला  हा चित्रपट  प्रदर्शित होणार आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.