अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याचा चित्रपट 'द डिसायपल'च्या समर्थनासाठी पुढाकार घेतला आहे. तब्बल 20 वर्षांनंतर, व्हेनिस चित्रपट महोत्सव स्पर्धेत निवड झालेला हा मराठी चित्रपट पहिला भारतीय चित्रपट बनला असून त्यामुळे देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. ही भारतीय सिनेमासाठी एक खूप मोठी उपलब्धी आहे आणि त्याचे अभिनंदन करण्यासाठी पुढे आलेली जॅकलीन ही बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहातली अभिनेत्री आहे.
एक उत्तम कथा, ग्रहणशील प्रेक्षक आणि जॅकलीन सारख्या प्रभावशाली अभिनेत्रीच्या समर्थनामुळे, प्रादेशिक सिनेमाला पुढे येण्यासाठी आणि वैश्विक प्रभाव निर्माण करण्यासाठी मदत मिळेल. जॅकलीन नेहमीच चांगल्या सिनेमाला पाठींबा देण्यासाठी उत्सुक असते आणि अशा प्रादेशिक सिनेमाला प्रोत्साहित करण्यावर विश्वास ठेवते ज्याची पात्रता असूनही त्याला त्याच्या हक्काचे समर्थन मिळत नाही.
स्पर्धेसाठी निवड झाल्यापासून 'द डिसायपल' अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. त्यापैकी एक म्हणजे या चित्रपटाला विशेषत: बॉलिवूडच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे, कारण बॉलीवूड हा भारतीय सिनेमाचा मुख्य प्रवाह असून त्याची पोहोच जगभरात आहे. यामुळे सिनेमाचा व्यासपीठ अधिक व्यापक आणि स्वीकारार्ह बनणार आहे. जॅकलिन ही बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री असून तिच्या सोशल मीडियाच्या आवाका मोठा आहे. तिच्याकडून मिळालेला हा पाठिंबा आणि प्रोत्साहन नक्कीच या चित्रपटाकडे अनेकांचे लक्ष वेधणारा ठरणार आहे. जॅकलिन ही एक उत्तम व्यक्ती आहे आणि ती समाजाच्या भल्यासाठी करत असलेल्या छोट्या-छोट्या कृतीतून हे वेळोवेळी दाखवून देत असते. कोरोनाविषयी जागरुकता वाढविण्यासाठी कोरोनाग्रस्त व्यक्तींसोबत बोलणे असो किंवा प्राणी कल्याणासाठी केलेले कार्य, जॅकलिनने नेहमीच आपल्या मदतीचा हात आवश्यकता असलेल्यांसाठी पुढे केला आहे.