मुंबई - बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांची सिनेसृष्टीत येण्यापूर्वी अत्यंत हलाखीची परिस्थिती होती. मात्र, आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी सिनेसृष्टीत दमदार छाप उमटवली. अलीकडेच त्यांनी 'दि कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आपल्या शालेय जीवनातील काही खास किस्से सांगितले.
जॅकी जेव्हा चाळीमध्ये राहायचे तेव्हा ते एका श्रीमंत घराण्यातील मुलीच्या प्रेमात पडले होते. ही आठवण सांगताना ते म्हणाले, 'एकदा त्या मुलीने मला आईला भेटायचं आहे, असे म्हटले होते. मी त्यावेळी तिला खोटंच सांगितलं होतं, की मी माझ्या आईसोबत राहत नाही. त्यानंतर घरी येऊन आईला काही वेळासाठी बाहेर जायला सांगितलं होतं. आईने देखील मला साथ देत जवळपास ३० मिनिटे घराबाहेर राहिली. नंतर, मला या गोष्टीचं वाईट वाटलं. पुढे मी त्या मुलीला माझ्या परिस्थितीविषयी सर्व खरं सांगितलं होतं', असे जॅकी यांनी यावेळी सांगितले.
-
Picture From Yesterday Shot 📷
— Kapil FC Delhi ❤️ (@KapilFansDelhi) January 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Comedy King @KapilSharmaK9 With #JackieShroff Sir !#TheKapilSharmaShow #TKSS #KapilSharma pic.twitter.com/hwMaJebwz4
">Picture From Yesterday Shot 📷
— Kapil FC Delhi ❤️ (@KapilFansDelhi) January 8, 2020
Comedy King @KapilSharmaK9 With #JackieShroff Sir !#TheKapilSharmaShow #TKSS #KapilSharma pic.twitter.com/hwMaJebwz4Picture From Yesterday Shot 📷
— Kapil FC Delhi ❤️ (@KapilFansDelhi) January 8, 2020
Comedy King @KapilSharmaK9 With #JackieShroff Sir !#TheKapilSharmaShow #TKSS #KapilSharma pic.twitter.com/hwMaJebwz4
हेही वाचा -'मला तुझा अभिमान वाटतो', दीपिकाचा 'छपाक' पाहून रणवीर सिंग भावूक
जॅकी यांनी त्यांच्या स्ट्रगलबद्दलही बऱ्याच गोष्टी यावेळी सांगितल्या. अर्चना पुरण सिंग यांनी देखील त्यांना मदत केल्याची आठवण त्यांनी सांगितली.
हेही वाचा -जागतिक मराठी अकादमी संमेलन: पाहा चित्र, शिल्प आणि काव्याचा तिहेरी संगम