ETV Bharat / sitara

ह्रतिक रोशन कुटुंबीयांनी मांडलाय सुनैनाचा छळ, रंगोली चंडेलचा आरोप

ह्रतिक रोशनच्या कुटुंबीयांकडून सुनैना रोशनचा छळ केला जात असल्याचे ट्विट कंगना रानावतची बहिण रंगोली चंडेल हिने केले आहे. सुनैना सतत रडत असून ती आपले दुःख कंगनाला सांगत असते असेही तिने म्हटलंय.

author img

By

Published : Jun 25, 2019, 4:45 PM IST

कंगना रानावत आणि तिची बहिण रंगोली चंडेल

मुंबई - अभिनेता ह्रतिक रोशन आणि त्याच्या कुटुंबीयांवर हल्ला करण्याची एकही संधी कंगना रानावतची बहिण रंगोली चंडेल सोडत नाही. ह्रतिकच्या बहिणीला मारहाण होत असून रोशन कुटुंबीय तिचा छळ करीत असल्याचे ट्विट तिने मंगळवारी केले आहे.

रंगोलीने शेअर केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, सुनैना रोशन सतत रडत असते. ती रंगोलीच्या संपर्कात असून मीडियाशी बोलल्यानंतर सुनैनाने आपला फोन स्वीच ऑफ केलेला आहे.

"गेली महिनाभर सुनैना कंगनाशी प्रत्येक दिवशी बोलत असते. ती माझ्याशी बोलली आणि सतत रडत होती. मीडियाशी बोलल्यानंतर तिचा फोन स्वीच ऑफ झालाय. तिच्या कुटुंबीयांनी तिला मारहाण केली असून ते छळ करीत असल्याचे ती म्हणाली. मी हताश झाले असून काय करावे समजत नाही.", असे रंगोलीने ट्विटमध्ये म्हटले आहे.

गेल्या आठवड्यातही असेच आरोप रंगोलीने केले होते. सुनैना एका मुस्लीम मुलाच्या प्रेमात असल्यामुळे घरचे लोक तिचा छळ करीत असल्याचे तिने म्हटले होते. यासाठी ती कंगनाची मदत घेत असल्याचेही तिने म्हटले होते.

Intro:सातारा:-आपल्या सातारच्या स्पर्धकाला बिग बॉस 2 मध्ये जाण्याची संधी मिळाली आहे. मात्र, एखाद्या गुन्ह्यामुळे त्याला अडसर येऊ नये, म्हणून आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या सूचनेनुसार 2012 साली दाखल केलेला खंडणीचा गुन्हा मागे घेत असल्याचे फिरोज पठाण यांनी म्हटले आहे. त्यामुळे अभिजित बिचुकले यांचा बिग बॉसमध्ये पुन्हा सहभागी होण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे.
Body:कवी मनाचा नेता अशी हटके ओळख असलेला सातारचा अभिजित बिचुकले वेळोवेळी या-ना त्या कारणाने चर्चेत होता. त्याने आता तर चक्क बिग बॉस-2 मध्ये उडी घेतली आहे. मात्र, चेक बाऊन्स प्रकरणात त्याला अटक झाली आणि सर्वत्र खळबळ उडाली. त्यानंतर शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.  त्यास जामीन मंजूर झाला मात्र, त्याचवेळी 2012 साली फिरोज पठाण यांना खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल होता. त्यात त्यांचा जामीन फेटाळला आणि त्यांना अटक झाली. मात्र, फिर्यादी फिरोज पठाण यांनी आपल्या सातार्‍याचा स्पर्धक बिग बॉस मध्ये गेला आहे आणि आपल्यामुळे त्याची ही संधी हिरावू नये. त्याने बिग बॉस जिंकावे यासाठी आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या सांगण्यावरून आपला गुन्हा मागे घेतला आहे. आता पठाण यांनी गुन्हा मागे घेतला असल्याने त्यांच्या जामिनचा अडसर दूर झाला आहे. त्यामुळे लवकरच अभिजित हा बिग बॉसच्या सेटवर पुन्हा दिसणार आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.