ETV Bharat / sitara

सुशांत सिंग राजपूतच्या ५० स्वप्नांची यादी पाहून रेहा चक्रवर्तीने दिली 'ही' प्रतिक्रिया - सुशांत सिंग राजपूत

सुशांतच्या या स्वप्नांच्या यादीत बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. अगदी, विमान उडवणं शिकण्यापासून ते कैलास पर्वतात ध्यानधारणा करण्यापर्यंत सर्व स्वप्नाची त्याने यादीच तयार केली आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या ५० स्वप्नांची यादी पाहून रेहा चक्रवर्तीनेही दिली 'ही' प्रतिक्रिया
author img

By

Published : Sep 14, 2019, 8:36 PM IST

मुंबई - छोट्या पडद्यावरून बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आपली ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे सुशांत सिंग राजपूत. 'शुद्ध देसी रोमान्स', 'काई पो चे', 'एम.एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी', 'केदारनाथ' आणि अलिकडेच प्रदर्शित झालेला 'छिछोरे' यांसारख्या चित्रपटात त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या यशाचा ग्राफ दिवसेंदिवस वाढत चाललेला पाहायला मिळतो. मात्र, एवढ्यावरच न थांबता सुशांतला त्याची ५० स्वप्न पूर्ण करायची आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने त्याच्या ५० स्वप्नांची यादी शेअर केली आहे.

त्याच्या या स्वप्नांच्या यादीत बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. अगदी, विमान उडवणं शिकण्यापासून ते कैलास पर्वतात ध्यानधारणा करण्यापर्यंत सर्व स्वप्नाची त्याने यादीच तयार केली आहे. त्याला लोंबरगीनी येथे स्वत:चं असा आलिशान बंगला बांधायचा आहे. तसंच पर्यावरण संवर्धनासाठी १००० झाडं लावण्याचाही त्याचा मानस आहे.

हेही वाचा-केआरकेच्या गाण्यावर बच्चन फिदा, बिग बीने शेअर केली गाण्याची लिंक

त्याला डाव्या हातानं क्रिकेट खेळायचं आहे. इंजिनियरींग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एक दिवस राहायचं आहे. नासामध्ये वर्कशॉप करायचं आहे. ६ पॅक्स अॅब्स बनवायचे आहेत. टेनिस चॅम्पियन्ससोबत टेनिस खेळायचं आहे. जंगलात जाऊन आठवडाभर धमाल करायची आहे. घोडेस्वारी करायची आहे. नृत्याचे १० प्रकार शिकायचे आहेच. तर, मोफत शिक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्नही करायचे आहेत. अश्या बऱ्याच स्वप्नांची यादी त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

त्याच्या या स्वप्नांची यादी पाहून अभिनेत्री रेहा चक्रवर्ती हिनेही आपली प्रतिक्रिया देत त्याला 'ड्रीमर' असं म्हटलं आहे. रेहा आणि सुशांत एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, दोघांचेही लद्दाख येथील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तेव्हापासून दोघांच्या नात्याची चर्चा सुरू आहे.

reha replied as dreamer
रेहा चक्रवर्तीने दिलेली प्रतिक्रिया

हेही वाचा-अॅक्शन टिझर : पाहा, श्वास रोखून धरणारी दृष्ये आणि जीव धोक्यात घालणारा पाठलाग

सुशांतचे नाव क्रिती सेनॉन आणि सारा अली खानसोबतही जोडले गेले होते. त्यापूर्वी तो अंकिता लोखंडे हिच्यासोबत ६ वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता. पुढे दोघांचेही मार्ग वेगळे झाले. आता अंकिता लोखंडेच्या आयुष्यात विकी जैनची एन्ट्री झाली आहे. दोघांनीही आपल्या नात्याची कबुली दिली आहे. तर, सुशांत सध्या रेहाला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

रेहाने 'जलेबी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

हेही वाचा-अभिनेत्री कियारा अडवाणीने मारली अशी किक, व्हिडिओ पाहून व्हाल चकित

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.