वाशिंग्टन - मॉडेल हॅले बाल्दविनने पती जस्टीन बीबरने प्रपोज केलेल्या दिवसाचा पहिला वर्धापन दिन खास फोटो शेअर करीत साजरा केला. तिने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "१ वर्षापूर्वी मी माझ्या आयुष्यातील बेस्ट फ्रेंड तुला होकार दिला आणि आज त्याहून अधिक प्रेम नाही करु शकत."
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
मॉडेल हॅले बाल्दविनने इन्स्टाग्रामवर जस्टीनसोबतचा फोटो शेअर केलाय. पॉप स्टार जस्टीनने एका वर्षापूर्वी हॅलेला बहामास येथे जुलैमध्ये प्रपोज केले होते.
"प्रत्येक दिवस तुझ्यामुळे खूप सुंदर बनतो, माझे ह्रदय कायमचे तुझे आहे. इथे आम्ही शिकत आणि एकत्र वाढत आहोत.", असेही तिने पुढे लिहिलंय.
प्रपोज केल्यानंतर दोन महिन्यांनी हॅले आणि जस्टीन बीबरने न्यूयॉर्कमध्ये सिक्रेट लग्न केले होते.