ETV Bharat / sitara

शाकाहारी भोजनामुळे फिट आणि निरोगी - मानुषी छिल्लर

पृथ्वीराज या आगामी ऐतिहासिक चित्रपटातून अभिनेत्री मानुषी छिल्लर ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिला शाकाहार पसंत असल्याचे मानुषीने म्हटले आहे. आपल्याला शाकाहार सूट होतो आणि मला फिट आणि निरोगी राखतो, असेही ती म्हणाली.

author img

By

Published : Nov 26, 2020, 3:08 PM IST

Manushi Chiller
मानुषी छिल्लर

मुंबई - अभिनेत्री मानुषी छिल्लर हिला शाकाहारी भोजन खूप पसंत आहे. यामुळेच आपला फिटनेस असल्याचे आणि निरोगी राहात असल्याचे तिने म्हटलंय.

आंतरराष्ट्रीय मीटलेस डेच्या निमित्ताने बोलताना ती म्हणाली, "शाकाहारी असणे ही माझी वयैक्तिक पसंती आहे. हे माझ्यासाठी नेहमीचे आयुष्य असून ते पुढेही तसेच राहील. कारण माझे आई वडिल शाकाहारी आणि आणि त्यामुळे मीदेखील आहे. खरंतर त्यासाठी त्यांनी माझ्यावर कधीही जबरदस्ती केली नाही. ही माझ्या व्यक्तीगत आवड आहे. कारण माझ्यासाठी शाकाहार सूट होतो आणि मला फिट आणि निरोगी राखतो."

हेही वाचा -'पृथ्वीराज'च्या सेटवर परतल्याने मानुषी छिल्लर उत्साही

ती नेहमीच तंदुरुस्ती आणि पौष्टिकतेबद्दल खूप उत्साही असल्याचे मानुषी सांगते. यापूर्वीच्याएका मुलाखतीत तिने ही गोष्ट सांगितली होती.

ती म्हणाली, "अशा बर्‍याच गोष्टी आहेत ज्याबद्दल मी खूपच उत्कट आहे आणि आरोग्य आणि पोषण या यादीमध्ये सर्वात वर आहे. मी आपल्या जेवणात कसा आहार घेते आणि संतुलन ठेवते, की ज्यामुळे मला वारंवार भूक लागणार नाही आणि मी आरोग्याचीही काळजी घेऊ शकेन. सोशल मीडिया जागरूकता मोहीम खूप मजेदार असेल आणि मला आशा आहे, की याद्वारे मी अधिकाधिक माझ्यासारख्या विचार करणार्‍या लोकांशी जोडले जाईन. "

हेही वाचा -'आश्रम' वेब सिरीजच्या तिसऱ्या सिझनची बॉबी देओलला प्रतीक्षा

'पृथ्वीराज' या आगामी ऐतिहासिक चित्रपटाद्वारे मानुषी अक्षय कुमारसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.