मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून लोकप्रिय झालेला इरफान पठाण आता त्याच्या नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. लवकरच तो अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. एका तमिळ चित्रपटातून तो सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. 'चिया विक्रम ५८' असं या तमिळ चित्रपटाचं नाव आहे.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी इरफान पठाणचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओसोबतच इरफानच्या नव्या इनिंगची माहितीदेखील त्यांनी शेअर केली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -एक नाही तर २ चित्रपटांची घोषणा करणार 'किंग खान'?
दिग्दर्शक अजय गणमुथु हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. तर, ललित कुमार यांच्या सेव्हन स्क्रीन स्टुडिओअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात होणार आहे. या चित्रपटात इरफान पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर, सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान हे या चित्रपटाला संगीत देणार आहेत.
-
Indian Cricketer #IrfanPathan on board for #ChiyaanVikram58! pic.twitter.com/fApLxhvIGR
— Review Ram (@MovieReviewRam) October 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Indian Cricketer #IrfanPathan on board for #ChiyaanVikram58! pic.twitter.com/fApLxhvIGR
— Review Ram (@MovieReviewRam) October 14, 2019Indian Cricketer #IrfanPathan on board for #ChiyaanVikram58! pic.twitter.com/fApLxhvIGR
— Review Ram (@MovieReviewRam) October 14, 2019
'सेव्हन स्क्रीन स्टुडिओ'च्या ट्विटर अकाऊंटवरुनही इरफानचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या चित्रपटात इरफान सोबत अभिनेता विक्रम सुद्धा भूमिका साकारणार आहे. चिया म्हणजे 'देवाची भेट' असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे आता क्रिकेट व्यतीरिक्त इरफानची ही नवी इनिंग प्रेक्षकांना किती भावते, हे पाहणं रंजक ठरेल.
-
Mubarak🌹 https://t.co/Orl30TXczC
— A.R.Rahman (@arrahman) October 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Mubarak🌹 https://t.co/Orl30TXczC
— A.R.Rahman (@arrahman) October 14, 2019Mubarak🌹 https://t.co/Orl30TXczC
— A.R.Rahman (@arrahman) October 14, 2019
हेही वाचा - 'बिग बीं'पेक्षा मोठी आहे शाहरुखची फॅन फोलोविंग, किंग खानने 'असे' मानले आभार