मुंबई - बॉलिवूडचा 'दबंग' स्टार सलमान खान 'दबंग ३' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याने 'दबंग' मध्ये साकारलेली 'चुलबूल पांडे'ची भूमिका चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरली होती. 'दबंग ३'मध्येही त्याची हिच दमदार झलक पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटातील एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये 'चुलबूल पांडे'ची खास ओळख करुन देण्यात आली आहे.
'दबंग ३'च्या सेटवरुन आत्तापर्यंत बरेचसे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सलमान खाननेही या चित्रपटाचे अपडेट्स वेळोवेळी चाहत्यांशी शेअर केले आहेत. 'स्वागत नही करोगे हमारा', असे कॅप्शन देत त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. नेहमीप्रमाणेच सलमानच्या खास अंदाजात 'चुलबूल पांडे'ची ही झलक या व्हिडिओत पाहायला मिळते.
-
Hello! My name is Chulbul Pandey.
— Chulbul Pandey (@BeingSalmanKhan) October 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Nice to meet you! #Dabangg3WithChulbulPandeyhttps://t.co/veZjWKAwyp @arbaazSkhan @sonakshisinha @saieemmanjrekar @PDdancing @KicchaSudeep @nikhil_dwivedi @SKFilmsOfficial @saffronbrdmedia
">Hello! My name is Chulbul Pandey.
— Chulbul Pandey (@BeingSalmanKhan) October 1, 2019
Nice to meet you! #Dabangg3WithChulbulPandeyhttps://t.co/veZjWKAwyp @arbaazSkhan @sonakshisinha @saieemmanjrekar @PDdancing @KicchaSudeep @nikhil_dwivedi @SKFilmsOfficial @saffronbrdmediaHello! My name is Chulbul Pandey.
— Chulbul Pandey (@BeingSalmanKhan) October 1, 2019
Nice to meet you! #Dabangg3WithChulbulPandeyhttps://t.co/veZjWKAwyp @arbaazSkhan @sonakshisinha @saieemmanjrekar @PDdancing @KicchaSudeep @nikhil_dwivedi @SKFilmsOfficial @saffronbrdmedia
हेही वाचा- शाळेत असताना दीपिका होती मस्तीखोर, शेअर केल्या खास आठवणी
या चित्रपटात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा 'रज्जो'ची भूमिका साकारत आहे. तसंच महेश मांजरेकर यांची मुलगी सई हिचीदेखील या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. आयफा अवार्ड्स सोहळ्यात सलमान खानने सईची सर्वांना ओळख करुन दिली. या चित्रपटात तिची आणि सलमान खानची केमेस्ट्री पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभू देवा करत आहेत. २० डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
हेही वाचा -जॉन अब्राहम 'सत्यमेव जयते'च्या सिक्वेलसाठी सज्ज, फर्स्ट पोस्टर प्रदर्शित