मुंबई - यंदाचं वर्ष हे बॉलिवूडसाठी फारच लाभदायक ठरलं आहे. बऱ्याच चित्रपटांनी यावर्षी १०० कोटीपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. अक्षय कुमार आणि आयुष्मान खुराना हे यावर्षीदेखील चर्चेत राहिले. इतर कलाकारांच्या तुलनेत या दोन्ही अभिनेत्यांनी यंदाचं बॉक्स ऑफिस गाजवलं. काही चित्रपट अपयशीदेखील ठरले. तर, काही अल्पबजेट चित्रपटांनीही चांगला व्यवसाय केला. आता पुढच्या वर्षीदेखील नवनव्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहायला मिळणार आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर', 'छपाक' यांसारखे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. पाहुयात पुढच्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची यादी...
अक्षय कुमारचे सर्वाधिक चित्रपट २०२० वर्षात प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये 'सूर्यवंशी', 'लक्ष्मी बाँब', 'पृथ्वीराज', 'बच्चन पांडे' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
पुढच्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची यादी -
- तान्हाजी - द अनसंग वॉरिअर - १० जानेवारी
- छपाक - १० जानेवारी
- स्ट्रीट डान्सर - २४ जानेवारी
- शुभ मंगल ज्यादा सावधान - २१ फेब्रुवारी
- पंगा - २४ जानेवारी
- बागी ३ - ६ मार्च
- गुंजन सक्सेना - १३ मार्च
- अंग्रेजी मीडियम - २० मार्च
- सूर्यवंशी -२७ मार्च
- ८३ - १० एप्रिल
- कुली नंबर वन - १ मे
- लक्ष्मी बाँब - २२ मे
- ब्रम्हास्त्र - मे
- थलायवी - २६ जून
- सडक - १० जुलै
- शमशेरा - ३१ जुलै
- भूल भूलैय्या २ - ३१ जुलै
- भूज - द प्राईड ऑफ इंडिया - १४ ऑगस्ट
- जर्सी - २८ ऑगस्ट
- गंगुबाई काठीवाडी - ११ सप्टेंबर
- सरदार उधम सिंग - २ ऑक्टोबर
- सत्यमेव जयते - २ ऑक्टोबर
- तुफान - २ ऑक्टोबर
- पृथ्वीराज - १३ नोव्हेंबर
- लाल सिंग चढ्ढा - २५ डिसेंबर
- बच्चन पांडे - २५ डिसेंबर
- दोस्ताना २ - प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही