मुंबई - अभिनेत्री भूमी पेडणेकर लवकरच हॉररपट असलेल्या 'दुर्गावती' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात झाली आहे. भूमीने चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो तिच्या इन्स्टास्टोरीमध्ये शेअर केले आहेत.
भूमीने शूटिंग सुरू झाल्यानंतर एक बुमरँग व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये तिने ज्या ठिकाणी शूटिंग सुरू आहे, तिथले काही फोटो पोस्ट केले आहेत. मध्यप्रदेश येथील जुन्या वाड्यामध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -'या' ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या सिक्वेलसाठी एकता कपूर, भूषण कुमार एकत्र
'दुर्गावती' हा चित्रपट अनुष्का शेट्टीच्या 'भागमती' या तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे. अभिनेत्री माही गिल ही देखील या चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे. विक्रम मल्होत्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, अक्षय कुमार आणि भूषण कुमार या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.
![Bhumi pednekar share Durgavati shooting location photo](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/b1_3001newsroom_1580375708_520.jpg)
![Bhumi pednekar share Durgavati shooting location photo](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/b2_3001newsroom_1580375708_285.jpg)
या चित्रपटाशिवाय ती विकी कौशलसोबत 'भूत' या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटाचेही फर्स्ट लुक पोस्टर तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -तापसी पन्नुच्या 'थप्पड'चं फर्स्ट लुक पोस्टर, ट्रेलरही लवकरच होणार प्रदर्शित