मुंबई - क्रिकेट आणि कलाविश्वातील बऱ्याच जोड्या आजवर तयार झाल्या आहेत. यापैकी काहींनी लग्नगाठही बांधली आहे. तर, काहींच्या डेटींगच्या चर्चा पाहायला मिळतात. आता अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी हिचेही क्रिकेट विश्वातील एका खेळाडूशी नाव जोडले जात आहे. त्यांचे काही फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
क्रिकेटर के. एल. राहुल याच्यासोबत अथिया डिनर डेटवर जाताना स्नॅप झाली आहे. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या मैत्रीच्या चर्चा आहेत. मात्र, दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याविषयी कोणताही खुलासा केला नाही. मात्र, दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. यावेळी त्यांची खास मैत्रीण आकांक्षा रंजन कपूर ही देखील त्यांच्यासोबत उपस्थित होती.
के. एल. राहुलचे अथियापूर्वी बऱ्याच अभिनेत्रींशी नाव जोडले गेले आहे. यामध्ये निधी अग्रवाल, सोनल चौहान आणि आकांक्षा रंजन कपूर यांच्या नावाचा समावेश आहे.
अथियाचेही नाव तिच्या 'हिरो' चित्रपटातील सहकलाकार अभिनेता सुरज पांचोली याच्यासोबत जोडले गेले होते. तर, 'मुबारकां' चित्रपटादरम्यान अर्जुन कपूरसोबतही तिच्या डेटींगच्या चर्चा होत्या.
हेही वाचा -IFFI 2019: गोव्यात रंगणार आतंरराष्ट्रीय चित्रपट सोहळ्याचा सुवर्णमहोत्सव
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, अथिया आता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत भूमिका साकारणार आहे. 'मोतीचुर चकनाचुर', असं या चित्रपटाचं नाव आहे. देवा मित्रा हसन या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. तर, राजेश आणि किरण भाटिया या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
हेही वाचा -२ नोव्हेंबरला शाहरुख खान पुन्हा परततोय छोट्या पडद्यावर