ETV Bharat / sitara

पहिला ‘अंतर्नाद पुरस्कार’ ज्येष्ठ तबलावादक राजू जावळकर यांना जाहीर - अंतर्नाद पुरस्कार’ ज्येष्ठ तबलावादक राजू जावळकर यांना जाहीर

यंदाचा पहिला ‘अंतर्नाद पुरस्कार’ ज्येष्ठ तबलावादक राजू जावळकर यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती अंतर्नाद संस्थेचे अमित गोखले यांनी दिली.

पहिला ‘अंतर्नाद पुरस्कार’ ज्येष्ठ तबलावादक राजू जावळकर यांना जाहीर
author img

By

Published : Nov 14, 2019, 3:49 PM IST

पुणे - अंतर्नाद संस्थेच्यावतीने मागील सहा वर्षांपासून विविध सांगितीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षीपासून संस्थेच्यावतीने दरवर्षी एका गुणवंत कलाकाराचा पुरस्कार देउन सन्मान करण्यात येणार असून, यंदाचा पहिला ‘अंतर्नाद पुरस्कार’ ज्येष्ठ तबलावादक राजू जावळकर यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती अंतर्नाद संस्थेचे अमित गोखले यांनी दिली.

या पुरस्काराबद्दल माहिती देताना अमित गोखले म्हणाले की, संगीतावरील प्रेमातून आम्ही या संस्थेची स्थापना केली. संगीतप्रेमींना वैविध्यपूर्ण कार्यक्रम देणे हा आमचा हेतू आहे. सहा वर्षात विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आम्ही ८८ शो केले आहेत, यामध्ये फ्युजन, इंस्ट्रुमेंटल, भावगीत, दिवाळी पहाट अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. या कार्यक्रमांच्या तिकीटविक्रीतून जमा झालेल्या रकमेतून कार्यक्रमाचा खर्च वगळता जी रक्कम उरेल त्यातून आम्ही आजपर्यंत अनेक स्वयंसेवी संस्थांना मदत केली आहे. आम्ही नुकताच ‘रंग ढोलकीचे’ हा कार्यक्रम लॉन्च केला आहे, या निमित्ताने आम्ही दरवर्षी एका गुणवंत कलावंतास पुरस्कार देण्याचे ठरवले आहे.

पहिले पुरस्कारार्थी राजू जावळकर यांचे वडील अंकुश जावळकर हे तबलावादक होते. यामुळे तबलावादनाची आवड घरातूनच निर्माण झाली. राजू जावळकर यांनी वयाच्या आठव्या वर्षी तबलावादनाचे धडे उस्ताद गुलाम रसूल खाँ साहेब यांच्याकडे गिरवायला सुरुवात केली. त्याचकाळात ते आर्य भूषण थिएटर येथे तमाशामध्ये साथसंगतही करत असत. त्यानंतर वयाच्या १४ व्या वर्षी अरुण दाते यांच्या ‘शुक्रतारा’ कार्यक्रमातून व्यावसायिक तबलावादन सुरु केले, पुढे त्यांनी किशोरीताई अमोणकर, उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, रवींद्र साठे, वीणा सहस्त्रबुद्धे, सदाशिवराव जाधव, नंदकिशोर कपोते, आनंद मोडक अशा अनेक दिग्गज कलावंताना साथसंगत केली, तसेच अनेक मराठी चित्रपटाच्या संगीतासाठी तबलावादन केले आहे, परदेशातही कार्यक्रम सादर केले आहेत. त्यांचे सांगीतिक योगदान लक्षात घेऊन पहिल्या अंतर्नाद पुरस्कारासाठी निवड केली आहे. ५१ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराचे वितरण अंतर्नाद आयोजित ‘रंग ढोलकीचे’ या कार्यक्रमात ज्येष्ठ तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे यांच्या हस्ते १६ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वा. टिळक स्मारक मंदिर येथे प्रदान करण्यात येणार असल्याचे अमित गोखले यांनी सांगितले.

Intro:Body:Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.