बंगळूरू - राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त कन्नड अभिनेता संचारी विजय यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आले आहे. संचारी विजय याचा १२ जून रोजी आपल्या मित्राच्या घरातून परत येत असताना अपघात झाला. तो त्याच्या मोटारसायकलवर होता. विजय खूपच गंभीर झखमी होता आणि त्याच्यावर बेंगळूरमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
कन्नड अभिनेता संचारी विजय याला गंभीर अपघात झाल्यानंतर बेंगळूरू येथील खासगी रुग्णालयाच्या इंटेंसिव्ह केअर युनिट (आयसीयू) येथे हलविण्यात आले. रिपोर्ट्सनुसार, अभिनेता जेव्हा त्याच्या मित्राच्या ठिकाणाहून घरी परत जात होता तेव्हा त्याचा अपघात झाला. संचारी विजयच्य मेंदूच्या उजव्या भागावर आणि मांडीच्या भागात दुखापत झाल्याचे सांगण्यात येत होते. आज १४ जून रोजी विजयला ब्रेन डेड घोषित करण्यात आले आहे.
यापूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना न्यूरोसर्जन म्हणाले होते की संचारी विजय यांची प्रकृती गंभीर आहे. ''सांचारी विजय यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्या मेंदूत रक्ताची गुठळी झाल्यामुळे, आम्ही शस्त्रक्रिया केली आहे, पुढचे काही तास गंभीर ठरतील'', असे डॉक्टर म्हणाले होते.
संचारी विजयने २०११ मध्ये रंगाप्पा होगबिटना या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. दसावला, हरिव्हू, ओग्गारणे, किलिंग वीरप्पन, वर्थमाना आणि सिपायी या चित्रपटासह अनेक कन्नड चित्रपटांमध्ये तो दिसला आहे. नानू अवनाल्ला अवलु या चित्रपटामुळे त्यांची कीर्ती झाली आणि या चित्रपटामुळे त्याला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
हेही वाचा - #BeTheMiracle च्या माध्यमांतून अभिनेत्री राशी खन्ना पुरवते कोरोना महामारीने ग्रस्त लोकांना अन्न!