मुंबई - चित्रपटामध्ये महिलांना कमजोर दाखवण्याच्या दृष्टीकोनात आता बदल झाला पाहिजे, असे अभिनेत्री भूमी पेडणेकरला वाटते. महिलांच्या अंगी अनेक शक्ती एकवटल्या आहेत, असे तिला वाटते.
भूमी म्हणते, "लैंगिक भेदभावाच्या आधारावर तयार झालेल्या विचारसरणीत बदल झाला पाहिजे. महिला आणि पुरुष यांना दाखवण्याच्या पद्धतीत बदल झाला पाहिजे. महिलांना कमी लेखले जाऊ नये. आपल्यालाही इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, आमच्या भावनिक आणि शारिरिक गरजा आहेत आणि आमच्या संतुलन राखण्याची क्षमता आहे. मला असे वाटते की महिलांमध्ये अधिक सामर्थ्य आहे. आम्हाला चित्रपटांमध्ये ते दर्शविणे आवश्यक आहे. "
भूमी पुढे म्हणाली, "तशाच प्रकारे चित्रपटांमध्ये पुरुषांची ओळख करून देण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. पुरुष ताकदवान असला पाहिजे, तो रडू शकत नाही, तो आपल्या भावना मोकळेपणाने सांगू शकत नाही ,असे म्हणून आपण पुरुषांवर भरपूर दबाव टाकत असतो. याचा अर्थ असा होतो की मजबूत असणे आवश्यक आहे. 'मर्द को दर्द नहीं होता', ही विचारसरणी बदलण्याची गरज आहे. "