ETV Bharat / sitara

पाहा, लव्हबर्ड्स ईशान-अनन्या, सिद्धार्थ-कियारा यांनी लावली शाहिद कपूरच्या बर्थडे पार्टीला हजेरी - शाहिद कपूर वाढदिवस

मुंबईत शाहिद कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीला कथित लव्हबर्ड्स अनन्या पांडे आणि ईशान खट्टर यांनी हजेरी लावली होती. अनन्या-ईशान शिवाय शाहिदच्या वाढदिवसाची पार्टी त्याच्या कबीर सिंग चित्रपटाची सह-कलाकार कियारा अडवाणी आणि तिचा कथित प्रियकर सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी देखील हजेरी लावली होती.

शाहिद कपूर बर्थडे पार्टी
शाहिद कपूर बर्थडे पार्टी
author img

By

Published : Feb 26, 2022, 3:32 PM IST

मुंबई (महाराष्ट्र) - शाहीद कपूरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला अभिनेत्री अनन्या पांडेच्या आणि ईशान खट्टरच्या उपस्थितीने त्यांच्या गाजलेल्या रोमान्सला हवा मिळाली आहे. अनन्या-ईशान शिवाय शाहिदच्या वाढदिवसाची पार्टी त्याच्या कबीर सिंग चित्रपटाची सह-कलाकार कियारा अडवाणी आणि तिचा कथित प्रियकर सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी देखील हजेरी लावली होती.

शाहिदने शुक्रवारी आपला ४१ वा वाढदिवस साजरा केला. या पार्टीतील सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल झाली आहेत. यावेळी फोटोग्राफर्सने बर्थडे बॉयसह त्याची पत्नी मीरा आणि मुले, मीशा आणि झैन, त्याचा धाकटा भाऊ आणि अभिनेता इशान यांचे फोटो क्लिक केले आहेत.

मीरा आणि अनन्या पांडे
मीरा आणि अनन्या पांडे

मीराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये देखील अनन्या पांडेसोबतचा फोटो शेअर केला आहे. यामुळे ती गेट-टूगेदर पार्टीमध्ये उपस्थित असल्याची खात्री होते. फोटोत मीराला सनग्लासेससह फुलांचा टॉप घातलेला दिसत आहे. तर अनन्याने पांढऱ्या-हिरव्या फुलांचा स्ट्रॅपी ड्रेस परिधान केला होता.

शाहिद कपूर बर्थडे पार्टीत सेलेब्रिटींची हजेरी

रात्री सिद्धार्थ आणि कियारा शाहिद कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीला एकत्र आल्याचे दिसले. सिद्धार्थ आणि कियारा शाहिदच्या घरी त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी एकत्र आले होते. अफवा असलेल्या जोडप्याने वाढदिवसाच्या पार्टीनंतर फोटोंसाठी पोझ देखील दिली.

दरम्यान अनन्या आणि ईशान गेल्या एक वर्षाहून अधिक काळ डेट करत आहेत. या दोघांनी अद्याप अधिकृत याची गोषणा केलेली नसली तरी दोघेही विविध स्टार-स्टड पार्ट्यांमध्ये आणि अगदी विमानतळांवर अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे. या दोघांनी 2020 मध्ये आलेल्या 'खाली पीली' चित्रपटात काम केले होते.

हेही वाचा - Kangana Ranaut Lock Upp : कंगना रणौतचा 'लॉक अप' शो अडचणीत, कोर्टाने दिले स्थिगितीचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.