ETV Bharat / sitara

Lockdown : विकी कौशलने करून दिली नव्या फॅनची ओळख, पाहा व्हिडिओ

विकी सध्या आपल्या कुटुंबासोबत सेल्फ आयसोलेशन मध्ये आहे. घरकामात देखील तो मदत करत आहे.

vicky koushal introduced his new fan in self isolation
Lockdown : विकी कौशलने करून दिली नव्या फॅनची ओळख, पाहा व्हिडिओ
author img

By

Published : Apr 4, 2020, 11:26 AM IST

मुंबई - सध्या देशभरात कोरोना विषाणूमुळे लॉक डाऊन सुरू आहे. या काळात सर्व सामान्य नागरिकांप्रमाणे सर्व कलाकार देखील घरात वेळ घालवत आहेत. अशात अभिनेता विकी कौशल ने एक व्हिडिओ शेअर करून आपल्या नव्या फॅनची ओळख करून दिली आहे.

विकी सध्या आपल्या कुटुंबासोबत सेल्फ आयसोलेशन मध्ये आहे. घरकामात देखील तो मदत करत आहे. अलीकडेच त्याने घरातील पंखा साफ करण्याचे काम पूर्ण केले. हा व्हिडिओ शेअर करून त्याने त्यावर लिहलं आहे की तुम्हाला माझ्या नव्या फॅनची ओळख करून द्यावी म्हणून हा व्हिडिओ पोस्ट करत आहे.

तसेच 'जीसका लडका लंबा उसका भी बडा काम हैं, पंखा साफ करने के लिये स्टूल का क्या काम हैं', असे तो या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतो.

विकीच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

विकीने यापूर्वी कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी चाहत्यांनी खबरदारी बाळगावी म्हणून पोस्ट शेअर केली होती. तसेच कोणीही घराबाहेर पडू नये, आरोग्याची काळजी घ्यावी, असेही तो म्हणाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.