मुंबई - अॅक्शन स्टार टायगर श्रॉफच्या आगामी 'बागी 3' चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रसिध्द झाले आहे. 'बागी' चित्रपटाच्या दोन भागांना प्रेक्षकांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला होता. आता 'बागी 3' च्या या नव्या सिनेमांची प्रतीक्षा टायगरचे चाहते करीत आहेत.
टायगरने 'बागी 3' चे पहिले पोस्टर ट्विटरवर शेअर करीत लिहिलंय, ''सर्वात मजबूत शत्रूशी, सर्वात मोठ्या युध्दासाठी, देशासोबत उभा असलेला रॉनी परत आला आहे. 'बागी 3'चा ट्रेलर ६ फेब्रुवारीला रिलीज होईल.''
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
पोस्टरमध्ये टायगरच्या हातात मोठी रायफल आहे आणि तो टँकच्या दिशेने पाहात उभा आहे. पोस्टरच्या टॅगलाईनमध्ये लिहिलंय, ''यावेळी तो देशाच्या विरोधात उभा आहे.''
पोस्टरवरुन लक्षात येते की यावेळी 'बागी 3'मध्ये रॉनीला देशाच्या मोठ्या शत्रूशी लढाई करायची आहे.
टायगरच्या 'वॉर' या चित्रपटाला प्रचंड यश लाभले होते. यात तो ह्रतिक रोशनसोबत झळकला होता.
'बागी 3'चे दिग्दर्शन अहमद खान करीत असून ६ मार्च रोजी सिनमा रिलीज होईल.