ETV Bharat / sitara

स्वातंत्र्यदिनी प्रभास, अक्षयसह जॉन आमने-सामने, कोण मारणार बाजी? - john abraham

बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमार, जॉन अब्राहम आणि प्रभास यांच्यात चांगलीच टक्कर पाहायला मिळणार आहे. स्वातंत्र्यदिनी बॉक्स ऑफिसवर या बहुचर्चित चित्रपटांचा क्लॅश पाहायला मिळणार आहे.

स्वातंत्र्यदिनी प्रभास, अक्षयसह जॉन आमनेसामने
author img

By

Published : Jul 5, 2019, 12:14 PM IST

मुंबई - या स्वातंत्र्यदिनी प्रेक्षकांना भरपूर मनेरंजनाचा तडका पाहायला मिळणार आहे. याच दिवशी तीन मोठ्या कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमार, जॉन अब्राहम आणि प्रभास यांच्यात चांगलीच टक्कर पाहायला मिळणार आहे.

अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू , विद्या बालन, निथ्या मेनन आणि शर्मन जोशीसारखी तगडी स्टारकास्ट असणारा भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित 'मिशन मंगल' चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. तर जॉन अब्राहमचा २००८ साली दिल्लीतील ‘बाटला हाऊस’ चकमक प्रकरणावर आधारलेला 'बाटला हाऊस' चित्रपटही याच दिवशी प्रदर्शित होणार आहे.

या दोन्ही चित्रपटांशिवाय दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'साहो' चित्रपटही याच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने बॉक्स ऑफिसवर या बहुचर्चित चित्रपटांचा क्लॅश पाहायला मिळणार आहे. अशात आता प्रेक्षकांची मनं जिंकण्यात कोण यशस्वी ठरणार हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.