मुंबई - भारतात #MeToo या मोहिमेला सुरुवात करणाऱ्या तनुश्री दत्ताला हॉवर्ड विद्यापीठाकडून प्रमुख अतिथीचं आमंत्रण मिळाले आहे. 'मीटू'च्या माध्यमातून तिने भारतात येऊन सर्वप्रथम तिच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली होती. तिच्यानंतर अनेक महिलांनीही त्यांच्या कथा जगासमोर मांडल्या. १६ फेब्रुवारीला हावर्ड विद्यापीठात भारतीय परिषदेच आयोजन केले आहे. यात तनुश्रीची उपस्थिती लक्षवेधक असणार आहे.
तनुश्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. या कार्यक्रमात ती तिचा बॉलिवूड प्रवास, महिलांवर होणारे अत्याचार अशा विषयांवर चर्चा करणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
#MeTooच्या माध्यमातून तनुश्रीने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप लावले होते. 'मला न्याय मिळेल की नाही, हे पुढे पाहता येईल, मात्र महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत बोलण्यास सुरुवात तरी केली', असे ती एका माध्यमाशी बोलताना म्हणाली होती.
या मोहिमेतून अनेक बड्या कलाकारांची नावे धक्कादायकरित्या समोर आली होती. त्यामुळे ग्लॅमर जगाच्या पाठिमागचं वास्तव सर्वांसमोर आणण्यासाठी 'मीटू' मोहिम सुरु झाली होती.