मुंबई - डेव्हिड धवनच्या २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चश्मे बहाद्दुर' चित्रपटातून तापसीने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. पण, त्यापूर्वी तिने दक्षिणेत जवळपास डझनभर चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यानंतर ती मुंबईला आली आणि एका आव्हानात्मक करियरला सुरुवात केली. तिच्या नावावर १० चित्रपट असतानाही एखाद्या नवोदित कलाकाराप्रमाणे तिने कामाला सुरुवात केली.
हिंदीत पदार्पण केल्यानंतर तापसीने तिचा मुक्काम चेन्नईहून मुंबईत हलवला. तिच्या करियरमधील होत गेलेले बदल कसे होते याबद्दल तिने एकदा मुलाखतीत सांगितले होते. मुंबईत ती पार्ट्यांमध्ये सहभागी होत नसे.
एका आघाडीच्या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत तिला हिंदी चित्रपटसृष्टीतून सुरवातीपासून घाबरत आहे का असे विचारले होते. त्याला उत्तर देत तापसी म्हणाली, "माझ्या सारखीच्या कामाच्या प्रकारात, तुम्ही जेव्हा खूप संतुष्ट होता तेव्हा तुमची वाढ संपलेली असते. माझ्या चित्रपटातील भूमिकांमुळेही मी स्वत: ला माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते, अन्यथा ते कंटाळवाणे होऊ शकते. त्यात काम करताना कम्फर्ट झोन ही एखाद्या अभिनेत्यासाठी चांगली गोष्ट नाही म्हणून हिंदी चित्रपटांच्या सुरवातीपासूनच मी स्वत: ला इतकी गंभीरपणे घेत नाही. लोक माझ्याशी कसे वागतील याचा मी विचार केला नाही. मला संघर्ष करावा लागेल याची मी तयारी केली होती.''
बॉलिवूडमुळे तिला तिच्या चुकांमधून शिकण्याची संधी मिळाली आणि दक्षिणी भाषा शिकण्यापेक्षा तिच्या मातृभाषेत चित्रपट करणे खूपच सोपे असल्याची जाणीव तिला यामुळे झाली.
"हिंदी ही माझी मातृभाषा आहे आणि मला दक्षिणेतील भाषांपेक्षा जास्त परिचित आहे. मला माहित होते की मला जे हवे आहे ते मिळविण्यासाठी मला प्रयत्न करावे लागतील. बॉलिवूडने मला माझ्या चुकांमधून शिकण्याची आणि पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची संधी दिली. मला काय आवडत नाही हे मला नक्की माहित आहे त्यामुळे याचा उपयोग मला चित्रपटांची निवड करताना होतो.'', असे तापसी म्हणाली.
हिंदी चित्रपटसृष्टीत आठ वर्ष काम केल्यानंतर आता तचापसी पन्नू ही सर्वात बिझी कलाकारांपैकी एक आहे. तिच्याकडे अनेक चित्रपट आहेत. सध्या ती 'शाब्बास मितू' या चित्रपटात काम करीत आहे. हा चित्रपट भारतीय महिला वनडे क्रिकेट संघाची कर्णधार मिताली दोराई राज हिच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट प्रिया अवेन यांनी लिहिला असून राहुल ढोलकिया यांनी दिग्दर्शन केले आहे. विनील मॅथ्यू दिग्दर्शित 'हसीन दिलरुबा' या चित्रपटातही तापसी काम करीत आहे. या चित्रपटात ती अभिनेता विक्रांत मॅसीसोबत दिसणार आहे. तिचे आगामी चित्रपट 'रश्मी रॉकेट' आणि 'लूप लपेटा' आहेत.
हेही वाचा - करण जोहरने कार्तिक आर्यनला वगळले: सुशांतवर आलेला प्रसंग त्याच्यावर लादू नका, कंगना पुन्हा आक्रमक