ETV Bharat / sitara

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे प्रकरण अत्यंत भयंकर; कुटुंबीयांच्या वकिलाचा दावा - रिया चक्रवर्ती न्यूज

बिहार पोलिसांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशी सुरू केल्यापासून हे प्रकरण ‘भीषण’ असल्याचे जाणवत आहे, असा दावा सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह यांनी केला आहे. त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण
author img

By

Published : Aug 2, 2020, 8:03 PM IST

शिमला - बिहार पोलिसांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीचे पाऊल उचलल्यापासून हे प्रकरण ‘भीषण’ असल्याचे जाणवत आहे, असा दावा सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह यांनी केला आहे. तसेच, त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कायदा माहित नाही, असे राजपूत यांच्या वकिलांनी म्हटले.

‘उद्धव ठाकरेंचे विधान अजब होते. त्यांना कायदा माहीत नाही, अशी माझी खात्री आहे. एखाद्या गुन्हे प्रकरणात फिर्यादी पक्षाला न्याय आणि सत्य मिळणे आवश्यक असते. तक्रार दाखल करणाऱ्या एका व्यक्तीला नव्हे. दुर्दैवाने मुंबई पोलीस सत्याच्या जराही जवळ पोहोचलेले नाहीत. खरे म्हणजे, ते सुशांत सिंह राजपूत यांच्या आजूबाजूच्या, जवळच्या कोणाचीही उलट तपासणी किंवा चौकशी करत नव्हते,’ असे सिंह म्हणाले.

‘सुशांतच्या कुटुंबीयांकडून जी माहिती मिळाली आहे आणि बिहार पोलिसांनी चौकशीत जे काही मिळाले आहे, ते मिळते-जुळते आहे,’ असे वकील म्हणाले.

‘हे अत्यंत भयंकर प्रकरण आहे. आत्महत्येचा प्रयत्न असे प्राथमिक तपासणीत म्हणता येईल. मात्र, त्याहीपेक्षा काही अधिक गंभीर बाब योग्य प्रकारे चौकशी केल्यास समोर येऊ शकते,’ असे ते म्हणाले.

आता यापुढे या प्रकरणाच्या तळाशी जाण्याचे काम बिहार पोलीस करतील.

"रिया चक्रवर्ती यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती की, हा खटला बिहारहून मुंबईकडे वर्ग करावा. यापूर्वी त्या मुंबई पोलीस योग्य प्रकारे तपास करत नसल्याची तक्रार करत होत्या आणि त्यांना सीबीआय चौकशी हवी होती. आता पाटणा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता हे प्रकरण मुंबई पोलिसांकडे हस्तांतरित व्हावे अशी त्यांची इच्छा आहे, ज्यांच्या कामाने असंतुष्ट असल्याचे त्यांनी आधी म्हटले होते,' असे सिंग म्हणाले.

अलीकडेच रियाने एक व्हिडिओ संदेश जारी केला होता. ज्यामध्ये तिने आपल्याला न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे आणि आपल्याला न्याय मिळेल असे सांगितले.

या संदेशाविषयी बोलताना सिंह म्हणाले, ‘व्हिडीओमध्ये रिया ती काय म्हणत होती, ते फारसे विशेष नाही. तर, ती कशी दिसत आहे, ते अधिक महत्त्वाचे आहे. मला वाटत नाही की, तिने तिच्या आयुष्यात कधीही असा सलवार-सूट घातला असेल. तिला स्वत: ला एक साधी स्त्री म्हणून दाखवायचे होते.’

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त करण्यासह विविध कलमांखाली रियाविरोधात बिहारच्या पाटणामध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सुशांत 14 जून रोजी मुंबईतील त्याच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळला होता.

एका वेगळ्या घटनाक्रमात या प्रकरणाचा तपास करणारे बिहार पोलिस कर्मचारी तपासाच्या भाग म्हणून आज मुंबईतील दिग्दर्शक रुमी जाफरी यांच्या घरी पोहोचले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहार पोलिसांचे एक पथक मुंबईत आले आहे.

दरम्यान, रियाच्या याचिकेवर महाराष्ट्र सरकार आणि सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका रद्द करण्याची मागणी करणारी विनंती दाखल केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.