नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी चौकशीची जबाबदारी केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे (सीबीआय) सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिल्यानंतर, आज एजन्सीचे विशेष तपास पथक मुंबईमध्ये दाखल झाले आहे.
सूत्रांनी सांगितले की, मुंबईकडे जाणाऱ्या या पथकाचे प्रमुख सीबीआय पोलिस अधीक्षक (एसपी) नुपूर प्रसाद असतील. कोविड-१९ शी संबंधित वैद्यकीय अहवालासह ते मुंबई गाठतील. बिहार पोलिसांच्या पथकाला आठवड्याभरापूर्वी अडचणींचा सामना करावा लागला होता, याची दक्षता हे पथक घेत आहे.
सूत्रांनी असेही म्हटले आहे की मुंबई पोलिसांकडून सर्व कागदपत्रे सीबीआय पथक गोळा करेल आणि ते सुशांत प्रकरण हाताळणाऱ्या तपास अधिकाऱ्यांनाही भेटतील. गरज भासल्यास हे पथक मुंबई पोलिसांच्या डीसीपीशीही बोलेल ज्यांनी सुशांत प्रकरण हाताळले होते. या अधिकाऱ्यांशी सुशांतच्या कुटुंबाने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अभिनेत्याचा जीव धोक्यात असल्याचे सांगून व्हॉट्सअॅप चॅटवरुन शेअर केले होते.
एजन्सीचे अधिकारी सुशांतच्या वांद्रे येथील घरी देखील भेट देऊ शकतात, जिथे तो 14 जून रोजी मृत अवस्थेत आढळला होता. या पथकाने मृत्यूनंतर आलेल्या पाच लोकांना बोलावले आहे. ही टीम सुशांतची बहीण मितू सिंग यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - सुशांतच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करणार्या डॉक्टरांना येत आहेत धमकीचे फोन
बिहार सरकारने केंद्रीय एजन्सीकडे चौकशीची शिफारस केल्यानंतर सीबीआयने ७ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारच्या आदेशानुसार-34 वर्षीय अभिनेत्याच्या मृत्यूच्या चौकशीची जबाबदारी घेतली होती.
25 जुलै रोजी सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी बिहार पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीच्या आधारे सीबीआयने सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतचे माजी मॅनेजर श्रुती मोदी आणि फ्लॅट सोबती सॅम्युअल मिरांडा यांच्यासह अनेकांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सुशांतचे वडील आणि त्याची मोठी बहीण राणी सिंग यांचेही जवाब सीबीआयने नोंदवले आहेत.
एजन्सीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या कुटुंबाच्या जवाबानुसार ही आत्महत्या नसून खून असल्याचे म्हटले आहे.