मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे की, याचिकाकर्ता अलका प्रिया यांच्याकडे कोणतीही लोकस स्टँडी नाही. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. तुम्हाला आवश्यकता वाटत असल्यास तुम्ही मुंबई उच्च न्यायालयात जाऊन योग्य तो शोध घेऊ शकता, असे न्यायमूर्ती ए.एस. बोपन्ना आणि व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने नमूद केले.
अॅडव्होकेट के.बी. उपाध्याय यांनी याचिकाकर्त्याची बाजू न्यायालयासमोर मांडताना म्हटले की सुशांत हा चांगला व्यक्ती होता, तो अनेक सामाजिक कार्याला पाठिंबा देत होता. खंडपीठाने उत्तर दिले की एखादी व्यक्ती चांगली की वाईट, याचा काही संबंध नाही आणि ते कार्यकक्षाच्याबाबत आहे. जर काही सांगण्यासारखे काही असेल तर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जावे, असे खंडपीठाने याचिकाकर्त्याच्या वकिलाला सांगितले.
उपाध्याय यांनी मुंबई पोलिसांच्या तपासणीत अनेक अनियमितता असल्याचे याचिकेत म्हटले होते. उपाध्याय म्हणाले, “त्याच्या शरीरावर जखमांच्या खुणा होत्या." सुशांतसिंग राजपूत यांचे वडील के. सिंह यांनी गेल्या महिन्यात आत्महत्या केलेल्या आपल्या मुलाची फसवणूक व धमकावल्याचा आरोप करत रिया चक्रवर्तीच्याविरोधात पाटणा येथे एफआयआर दाखल केली होती. अभिनेत्रींनी रिया चक्रवर्तीने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणाची चौकशी बिहारमध्ये न करता मुंबईत वर्ग व्हावी अशी विनंती केली होती.
हेही वाचा - चला एकजूट होऊ, सत्यासाठी एकत्र उभे राहू, सुशांतच्या बहिणीचे आवाहन
रियाचे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले की, त्यांच्या आशिलाने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. यात पाटण्यातील दाखल चौकशी मुंबईत स्थलांतरीत करण्याची मागणी करण्यात आली आहे, जिथे अभिनेत्याच्या मृत्यूसंबंधीची चौकशी आधीपासून प्रगतीपथावर आहे. मानेशिंदे यांनी याचिकेचा मजकूर शेअर करण्यास नकार दिला. १४ जून रोजी सुशांतसिंहने आत्महत्या केली होती. त्या आधी सुशांत आणि रिया चक्रवर्ती रिलेशनशिपमध्ये होते. सुशांतच्या वडिलांनी रियावर फवणूक करुन वैद्यकिय अहवाल मडियासमोर उघड करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.