नवी दिल्ली - कोरोना साथीच्या काळात चित्रपट जगातील नायक सोनू सूद खऱ्या आयुष्यातही नायक म्हणून उदयास आला आहे. लॉकडाऊन दरम्यान त्याने असंख्य लोकांना मदत केली आणि अजूनही करत आहे. याकूब नावाची एक व्यक्ती गेल्या ४ वर्षांपासून अंथरुणातून उठून चालूही शकत नव्हता. मात्र सोनू सूद आणि एम्सच्या परिवाराने केलेल्या मदतीमुळे तो आता पायऱ्या चढू उतरू शकतो.
सोनू सूदने उचलला इम्प्लांटचा खर्च
याकूबच्या शस्त्रक्रिया व प्रत्यारोपणाचा सर्व खर्च सोनू सूदने केला आहे. तर, एम्सच्या परिवाराने रुग्णालयात राहण्याचा आणि डॉक्टरांची सेवा उपलब्ध केली. चार वर्षापासून अंथरुणावर खिळलेला याकूब आता चालू फिरू शकतो, असे डॉ. अमरिन्दर सिंह यांनी सांगितले.
एम्स कार्डिओ-रेडिओ विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमिंदर सिंग यांनी सांगितले की, ही संपूर्ण बाब गोपनीय आहे, म्हणूनच ते रुग्णांविषयी कोणतीही माहिती देऊ शकत नाहीत. परंतु आपण इतके सांगू शकतो की, एम्स परिवार आणि सोनू सूद यांच्या संयुक्त प्रयत्नाने या व्यक्तीची संपूर्ण हिप रिप्लेसमेंट अर्थात हिप सर्जरी केली गेली आहे. एम्सच्या ऑर्थोपेडिक विभागाचे डॉ. राजेश मल्होत्रा, डॉ. चित्रा आणि डॉ. दीपक गौतम यांनी टोटल हिप रिप्लेसमेंट मॅरेथॉन शस्त्रक्रिया करून या व्यक्तीला नवीन जीवदान दिले आहे.