मुंबई - अभिनेता अजय देवगणने शनिवारी चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी यांच्या आगामी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. १९६०च्या दशकात कामठीपुरामधील गंगूबाई, सर्वात शक्तिशाली, प्रेमळ आणि आदरणीय महिलेपैकी एक होती. गंगुबाईची भूमिका अभिनेत्री आलिया भट्ट साकारत आहे.
शुक्रवारी देवगणच्या प्रवक्त्याने बातमीला दुजोरा देताना सांगितले की, अजयने गंगूबाई काठियावाडीच्या टीमसोबत मुंबईतील एका स्टुडिओमध्ये तयार झालेल्या भव्य सेटवर सहभागी झाला आहे. या चित्रपटात अजय देवगण ‘महत्त्वपूर्ण भूमिका’ साकारताना दिसणार आहे.
भन्साळी प्रॉडक्शनच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोत अजय देवगण आणि संजय लीला भन्साळी एका सीनवर चर्चा करताना दिसतात. अजयचे टीममध्ये स्वागत करण्यात आले आहे.
'हम दिल दे चुके सनम' या रोमँटिक चित्रपटानंतर अजय देवगण आणि संजय लीला भन्साळी २२ वर्षानंतर एकत्र काम करीत आहेत
'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट प्रसिद्ध लेखक हुसेन झैदी यांच्या मुंबईच्या 'माफिया क्वीन्स'च्या पुस्तकातील एका अध्यायातून रूपांतरित झाला आहे. हा चित्रपट ३० जुलै रोजी देशभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होईल होईल.
हेही वाचा - ‘डान्स दिवाने’च्या मंचावर माधुरी दीक्षित थिरकली श्रीदेवीच्या गाण्यावर !