मुंबई - अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या रोहित शेट्टीच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. असाच रोहित शेट्टीचं दिग्दर्शन असलेला २०११ मध्ये प्रदर्शित झालेला सिंघम चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकून गेला. याच चित्रपटाला आज आठ वर्ष पूर्ण झाली आहेत.
याच निमित्ताने अजय देवगणने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. या सिनेमात अजने बाजीराव सिंघम नावाच्या पोलिसाची भूमिका साकारली होती. 'सिंघम'च्या सेटवरील एक फोटो शेअर करत अजयनं म्हटलं आहे, चुकीचं काय आहे, हे समजल्यानं काहीही फरक पडत नाही. तर चुकीची गोष्ट बरोबर केल्यानं पडतो. २२ जुलै, आठ वर्ष अजरामर संवादाची, जबरदस्त अॅक्शनची, कार स्टंटची आणि निर्भीड पात्राची, बाजीराव सिंघम...असं अजयनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यासोबतच हे सर्व प्रेक्षकांच्या प्रेमामुळे असल्याचंही त्यानं म्हटलं आहे.
-
गलत क्या है वो जानने से कोई फर्क नहीं पड़ता, गलत को सही करने से पड़ता है!
— Ajay Devgn (@ajaydevgn) July 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
22nd July. #8years to invincible dialogues, car rattles, power-packed action and the fearless character #BajiraoSingham.
It's the love of the audience #Singham still roars this loud. #RohitShetty and Team pic.twitter.com/fyrwhqoVAa
">गलत क्या है वो जानने से कोई फर्क नहीं पड़ता, गलत को सही करने से पड़ता है!
— Ajay Devgn (@ajaydevgn) July 23, 2019
22nd July. #8years to invincible dialogues, car rattles, power-packed action and the fearless character #BajiraoSingham.
It's the love of the audience #Singham still roars this loud. #RohitShetty and Team pic.twitter.com/fyrwhqoVAaगलत क्या है वो जानने से कोई फर्क नहीं पड़ता, गलत को सही करने से पड़ता है!
— Ajay Devgn (@ajaydevgn) July 23, 2019
22nd July. #8years to invincible dialogues, car rattles, power-packed action and the fearless character #BajiraoSingham.
It's the love of the audience #Singham still roars this loud. #RohitShetty and Team pic.twitter.com/fyrwhqoVAa
दरम्यान 'सिंघम' हा २०१० मध्ये आलेल्या 'सिंघम' या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हिंदी रिमेकमध्ये अजयशिवाय काजल अग्रवाल, सोनाली कुलकर्णी आणि मुरली शर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १५० कोटींचा गल्ला जमावला होता. सिनेमाला मिळालेल्या तुफान यशानंतर रोहित शेट्टी पोलिसांवर आधारित 'सिंघम २', 'सिंबा' आणि आता सूर्यवंशी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'सूर्यवंशी' चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार आहे.