ETV Bharat / sitara

क्योंकी तुम ही हो! 'आशिकी २'ला ६ वर्ष पूर्ण, श्रद्धा कपूरनं गायलं गाणं - aditya roy kapoor

श्रद्धा कपूरच्या आयुष्यात तर हा चित्रपट खऱ्या अर्थाने तिच्या फिल्मी करिअरचा आलेख पहिल्याच टप्प्यात उंचीवर नेणार ठरला.

श्रद्धा कपूरनं गायलं गाणं
author img

By

Published : Apr 27, 2019, 10:10 AM IST

मुंबई - आशिकी चित्रपटाला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर २०१३ मध्ये या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच आशिकी २ प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे या चित्रपटातून श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तरीही या नवोदीत जोडीच्या या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली.

श्रद्धा कपूरच्या आयुष्यात तर हा चित्रपट खऱ्या अर्थाने तिच्या फिल्मी करिअरचा आलेख पहिल्याच टप्प्यात उंचीवर नेणार ठरला. मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटाला आता नुकतेच ६ वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने श्रद्धाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती स्वतः क्योंकी तुम ही हो गाणं गात आहे.

चित्रपटातील या गाण्यानं प्रेक्षकांवर भूरळ पाडली होती. अशात आता पुन्हा एकदा हेच गाणं श्रद्धाच्या आवाजात ऐकणं तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच खास असणार आहे. मी सध्या जे काही आहे ते या चित्रपटामुळे आहे, असे कॅप्शन देत श्रद्धाने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Intro:Body:

Dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.