ETV Bharat / sitara

गोविंदाची नायिका शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण

गोविंदा आणि चंकी पांडे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ब्लॉकबस्टर 'आँखे' या चित्रपटातील अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण
शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण
author img

By

Published : Dec 30, 2021, 7:54 PM IST

मुंबई - अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने गुरुवारी सांगितले की तिला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. शिल्पा शिरोडकर 'हम' आणि 'खुदा गवाह' सारख्या चित्रपटात झळकली आहे. शिल्पाने गोविंदा आणि चंकी पांडे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ब्लॉकबस्टर आँखें चित्रपटमध्येही मुख्य भूमिका साकारली होती.

अभिनेत्रीने 'इन्स्टाग्राम' या सोशल मीडिया अकाऊंटवर सांगितले की, तिला चार दिवसांपूर्वी संसर्ग झाल्याचे आढळले होते.

शिल्पा शिरोडकर ही अँटी-कोविड-19 लस मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय सेलिब्रिटींपैकी एक होती. ती तिच्या कुटुंबासह दुबईत राहते आणि या वर्षी जानेवारीमध्ये तिने चीनची 'सिनोफॉर्म' लस घेतली होती.

शिल्पाने लिहिले, 'तुम्ही सर्व सुरक्षित रहा, लसीकरण करा आणि नियमांचे पालन करा.. तुमच्यासाठी काय चांगले आहे हे तुमच्या सरकारला माहीत आहे'.

भारताबाबत बोलायचे झाले तर, सध्या महाराष्ट्रात कोविड-19 चे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी राज्यात कोविड-19 चे 3,900 रुग्ण आढळले, त्यापैकी 85 जणांना 'ओमिक्रॉन' फॉर्मची लागण झाली आहे.

हेही वाचा - ठरल्या तारखेलाच Rrr होणार रिलीज, राजामौली निर्णयावर ठाम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.