ETV Bharat / sitara

शाहिद कपूर साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका? - छत्रपती शिवाजींवर चित्रपट

छत्रपती शिवाजी महाराजांवर एक चित्रपट बनणार असून यात मुख्य भूमिकेत शाहिद कपूरची असणार असल्याची चर्चा सध्या मनोरंजन जगतात आहे. २.० हा भव्य चित्रपट बनवलेल्या लाइका प्रॉडक्शनची ही निर्मिती असेल अशीही चर्चा आहे.

Shahid Kapoor to play titular role in film on Chhatrapati Shivaji?
शाहिद कपूर साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका?
author img

By

Published : Feb 26, 2021, 8:42 PM IST

मुंबई - संजय लीला भन्साळीच्या पद्मावतमध्ये महारावल रतन सिंगची भूमिका साकारल्यानंतर बॉलिवूड स्टार शाहिद कपूर पुन्हा ऐतिहासिक चित्रपटात पुन्हा परतण्याची तयारी करत आहे. हिंदवी स्वराज्य आणि मराठा साम्राज्याचा पाया घालणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आगामी काळात चित्रपट बनणार असून यात मुख्य भूमिका शाहिद साकारणार असल्याची चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शाहिद छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात अश्विन वर्दे आणि शाहिद पुन्हा एकदा एकत्र येतील. दोघांनी कबीर सिंग या चित्रपट काम केले होते. अश्विनने दक्षिण भारताच्या ए-लिस्ट प्रॉडक्शन बॅनर लाइका प्रॉडक्शनशी हातमिळवणी केली आहे. या प्रॉडक्शनने दिग्दर्शक शंकरच्या २०१८मध्ये रिलीज झालेल्या २.० चित्रपटाची निर्मिती केली होती. यामध्ये रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

अश्विन आणि शाहिदपूर्वी, अनेक चित्रपट निर्माते आणि कलाकार छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत. सन २०२० मध्ये रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बहुभाषिक चित्रपटाची घोषणा केली आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती रितेश देशमुखची मुंबई फिल्म कंपनी करणार आहे. अली अब्बास जफरदेखील शिवाजी महाराजांवर सलमान खान सोबत एक चित्रपट बसवण्याच्या विचारात आहे, अशी चर्चा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.