मुंबई - बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर याने मॉर्निंग राइडचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये तो बाइकवर बसलेला असून कॅमेऱ्याला पोज देताना दिसतो. त्याने यावेळी बाइकर जॅकेट, पँट आणि बूट परिधान केले असून करारी दिसत आहे.
त्याने फोटोला कॅप्शनमध्ये लिहिलंय, "मॉर्निंग राइड."
पोस्ट शेअरिंग वेबसाइटवर आत्तापर्यंत पोस्टला एकूण १० लाख लाईक्स मिळाल्या आहेत.
हेही वाचा - हिट चित्रपटांमुळे नाही तर, परफॉर्मन्समुळे लोकांनी ओळखावे - दिव्येंदू शर्मा
शाहिद आगामी 'जर्सी' या चित्रपटात दिसणार आहे. तेलुगूमध्ये गाजलेल्या जर्सी चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. याचे दिग्दर्शन मूळ तेलुगू चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केलेले गौतम टिन्नानुरी करीत आहेत. यात शाहिदसोबत मृणाल ठाकूर आणि पंकज कपूर यांच्याची महत्त्वाच्या भूमिका आहेत.
जर्सी या तेलुगू चित्रपटाला दक्षिणेत तुफान प्रतिसाद मिळाला होता. एका क्रिकेटरची ही कथा आहे. आपल्या तडाखेबंद फलंदाजीने धुंवाधार खेळी करणाऱ्या या क्रिकेटरच्या जीवनात एक असे वळण येते, की प्रेक्षक स्तब्ध होऊन जातात. जर्सी चित्रपटाला तेलुगूत मिळालेले यश हिंदीतही मिळेल याची खात्री निर्मात्यांना वाटते. शाहिद कपूरने यासाठी मेहनत घ्यायला सुरुवात केलीय. काही दिवसांपूर्वी क्रिकेट खेळत असतानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
हेही वाचा - 'सूरज पे मंगल भारी' १५ नोव्हेंबरला मोठ्या पडद्यावर रिलीजसाठी सज्ज
शाहिद कपूरने अलिकडेच अर्जुन रेड्डी या तेलुगु चित्रपटाचा कबीर सिंग हा हिंदी रिमेक केला होता. त्याला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला होता. विशेष म्हणजे जर्सी या तेलुगू चित्रपटातही नायकाचे नाव अर्जुन असेच आहे. हिंदी रिमेकमध्ये हेच नाव राहणार की बदल होणार हे लवकरच कळेल.