ETV Bharat / sitara

सारा अली खानचा लग्नाचा प्रस्ताव, शेअर केले 'वधू'च्या पेहराव्यातील फोटो - सारा अलीचा आगाम ीचित्रप

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने तिचे फोटोशूट शेअर केले आहे आणि सुशील, संस्कारी आणि घरगुती मुलगी म्हणून स्वत:चे वर्णन केले आहे. हे फोटो शेअर करताना तिने आपल्या लग्नासाठी प्रस्तावही मागितला आहे.

sara-ali-khan
सारा अली खान
author img

By

Published : Mar 20, 2021, 6:29 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानची सोशल मीडियावर खूप चांगली फॅन फॉलोइंग आहे आणि ती त्यावर खूप सक्रिय असते. ती एक सोशल मीडिया स्टार देखील आहे. तिची प्रत्येक इन्स्टाग्राम पोस्ट वेगाने व्हायरल होत असतात. ती अनेकदा तिची जबरदस्त आकर्षक आणि ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. अलीकडेच तिने फोटोशूटमधील काही फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

सारा अली खानच्या या फोटोशूट्सच्या फोटोंपेक्षा चाहत्यांचे लक्ष त्याच्या कॅप्शनने अधिक आकर्षित केले आहे. या फोटोमध्ये साराने फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला मरून रंगाच्या एम्ब्रॉयडरी लेहंगा घातला आहे. त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. यासोबत तिने खूप भारी दागिनेही घातले आहेत.

sara-ali-khan
सारा अली खानचे 'वधू'च्या पेहराव्यातील फोटो

स्वतःला म्हटले घरेलू, संस्कारी आणि सुशील

या फोटोशूटचे फोटो शेअर करताना सारा अली खानने स्वत: ला एक सुसंस्कृत, सभ्य आणि घरगुती मुलगी म्हणून वर्णन केले आहे. ती लग्नासाठी कोणीतरी प्रस्ताव देण्याची वाट पाहत आहे. तिने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “सुशील, घरगुती आणि सुसंस्कृत मुलीसाठी लग्नाचा काही प्रस्ताव आहे का?” चाहते तिच्या फोटोवर भाष्य करीत आहेत आणि तिच्या सौंदर्याचे कौतुकही करत आहेत.

'अतरंगी रे'मध्ये अक्षय आणि धनुषसोबत काम करतेय सारा

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे, तर सारा अली खान शेवटच्या वेळेस वरुण धवनची भूमिका असलेल्या 'कुली नं. 1 ' या चित्रपटात झळकली होती. ती आता चित्रपट निर्माते आनंद एल रायच्या बहुप्रतिक्षित 'अतरंगी रे' चित्रपटामध्ये दिसणार आहे. अक्षय कुमार आणि धनुष देखील या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत. अक्षय आणि धनुषसोबत साराचा हा पहिलाच चित्रपट आहे. अतरंगी रे यावर्षी ६ ऑगस्टला रिलीज होईल.

हेही वाचा - राम गोपाल वर्माचा 'डी कंपनी' रिलीज न होण्याचे 'हे' आहे खरे कारण!!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.