ETV Bharat / sitara

संजय दत्तने घेतला लसीचा पहिला डोस - बॉलिवूड सेलेब्सनी घेतली कोरोना लस

बॉलीवूडमधील अभिनेता संजय दत्तनेही कोरोना लस घेतली आहे. बीकेसीच्या जंबो कोविड सेंटरमध्ये त्याने लसीचा पहिला डोस घेतला.

संजय दत्तने घेतले लसीकरण
संजय दत्तने घेतले लसीकरण
author img

By

Published : Mar 24, 2021, 3:27 PM IST

मुंबई - पुन्हा एकदा कोरोना आपले पाय पसरतो आहे. या परिस्थितीमध्ये जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येते आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेतंर्गत अनेक सेलेब्रिटींनीदेखील लस टोचून घेतली आहे. आज अभिनेता संजय दत्त याने लसीचा पहिला डोस घेतला. त्याने बीकेसीच्या जंम्बो कोविड सेंटरमध्ये उपस्थित राहून लस घेतली.

हेही वाचा - कार्तिक आर्यननंतर आता सुपरस्टार आमिर खानला कोरोनाची बाधा

अभिनेता संजय दत्तने इंस्टाग्रामवर फोटो अपलोड करुन लस घेतल्याची माहिती दिली. संजय दत्तने फोटो शेअर करुन सर्व डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा - दिग्दर्शक केदार शिंदे यांचा आगामी चित्रपट ‘बाईपण भारी देवा’!

या कलाकारांनीही घेतली लस

अभिनेता सैफ अली खान, हेमा मालिनी, राकेश रोशन, सतीश शाह, जॉनी लिव्हर, मेघना नायडू तसेच कमल हसन यांनीही करोनाची लस घेतली होती. त्याचबरोबर दुबईत शिल्पा शिरोडकर हिनेही करोना लस घेतली. परदेशात कोरोना लस घेणारी ही पहिलीच बॉलिवूड अभिनेत्री ठरली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.