मुंबई - येथील हिंदूजा रुग्णालयात रविवारी सकाळी दाखल झालेल्या बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता दिलीप कुमारची यांची प्रकृती स्थिर आहे. रविवारी सकाळी साडे आठच्या सुमारास कुमार यांना खार येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दिलीप कुमारयांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर म्हटलंय की दोन तीन दिवसात त्यांना डिस्चार्ज मिळू शकेल.
-
Don’t believe in WhatsApp forwards.
— Dilip Kumar (@TheDilipKumar) June 6, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Saab is stable.
Thank you for your heart-felt duas and prayers. As per doctors, he should be home in 2-3 days. Insh’Allah.
">Don’t believe in WhatsApp forwards.
— Dilip Kumar (@TheDilipKumar) June 6, 2021
Saab is stable.
Thank you for your heart-felt duas and prayers. As per doctors, he should be home in 2-3 days. Insh’Allah.Don’t believe in WhatsApp forwards.
— Dilip Kumar (@TheDilipKumar) June 6, 2021
Saab is stable.
Thank you for your heart-felt duas and prayers. As per doctors, he should be home in 2-3 days. Insh’Allah.
"साहेब स्थिर आहेत. तुम्ही मनापासून दुआ आणि प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद. डॉक्टरांच्या मते, ते २- ३ दिवसांत घरी परततील इंशा'अल्लाह," असे दिली कुमार यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिण्यात आले आहे. अफवांपासून चाहत्यांनी दूर रहावे असे आवाहनहीकरण्यात आले आहे. "व्हॉट्सअप फॉरवर्डवर विश्वास ठेवू नका," असं त्यात म्हटलं आहे.
दिलीप कुमार यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून असलेले डॉ. जलील पारकर म्हणाले, "त्याला दम लागतो, त्यांचा ऑक्सिजन कमी होत आहे, म्हणून ते ऑक्सिजनच्या आधारावर आहेत. आम्ही त्यांचे बारकाईने निरीक्षण करीत आहोत."
गेल्या महिन्यात दिलीप कुमार यांना नियमित आरोग्य तपासणीसाठी याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हेही वाचा - दिग्गज अभिनेते दिलीप कुमार पुन्हा एकदा मुंबईतील रुग्णालयात दाखल