मुंबई - मेगास्टार अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या कलाकारांच्या यादीत अग्रस्थानी असतात. अमिताभ दररोज त्यांची न पाहिलेले फोटो आणि कविता चाहत्यांसोबत शेअर करतात. गेल्या अनेक दिवसांपासून अमिताभ बच्चन काही दुर्मिळ थ्रोबॅक फोटोशेअर करत आहेत. अमिताभ यांनी आता पुन्हा एकदा चित्रपटाच्या सेटवरुन स्वतःचे आणखी एक उत्तम थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे.
![मेगास्टार अमिताभ बच्चन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13154375_big-b.jpg)
बिग बीने शेअर केला क्रिकेट खेळतानाचा फोटो
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर काश्मीरमधील 'मिस्टर नटवरलाल' चित्रपटाच्या सेटवरील एक कृष्णधवल फोटो शेअर केला आहे. या फोटोत अमिताभ बच्चन क्रिकेट खेळताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना अमिताभ बच्चन यांनी लिहिले, ''शूटिंगची तयारी पूर्ण झालीय आणि लोकेशनवर क्रिकेट खेळतोय. मला वाटते ... बॅट थोडी छोटी पडलीय.''
तरुणपणाची आठवण
![मेगास्टार अमिताभ बच्चन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13154375_bb1.jpg)
या दिवसांमध्ये आयपीएल पुन्हा एकदा सुरू झाले आहे. सहाजिकच, बिग बींना त्यांचे क्रिकेटचे दिवस आठवले आहेत. यापूर्वी बिग बी यांनी अनेक थ्रोबॅक फोटो शेअर केले होते. एक संस्मरणीय फोटो शेअर करताना अमिताभ बच्चन यांनी फोटोत उपस्थित असलेल्या सर्व कलाकारांच्या नावांसह लिहिले, आजकाल असे मेळावे क्वचितच पाहायला मिळतात. या फोटोमध्ये अमिताभसोबत धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, प्रेम चोप्रा आणि जितेंद्र दिसत आहेत.
![मेगास्टार अमिताभ बच्चन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13154375_kkk.jpg)
तसे पाहिल्यास, बिग बींच्या बॉक्समध्ये तरुणाईच्या अनेक आठवणी आहेत. एक एक करून ते आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. याआधी त्यांनी पत्नी जया बच्चनसोबत एक फोटो शेअर केला होता, ज्यात ते जयाला मिठी मारताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना बिग बींनी लिहिले, 'आमचा पहिला चित्रपट, बन्सी आणि बिरजू, 49 वर्षांपूर्वी 1 सप्टेंबर 1970 रोजी रिलीज झाला.
वर्क फ्रंटवर बिग बी
![मेगास्टार अमिताभ बच्चन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13154375_mmm.jpg)
आजकाल अमिताभ बच्चन त्यांचा सर्वात लोकप्रिय टीव्ही क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती -13' होस्ट करत आहेत. याशिवाय, बिग बींनी अलीकडेच विकास बहलच्या 'गुड बाय' चित्रपटाचे शेड्यूल पूर्ण केले आहे. या चित्रपटात साऊथची सुपरहिट अभिनेत्री रश्मिका मंदाना दिसणार आहे. याआधी बिग बींचा 'चेहरे' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यात इम्रान हाश्मीने त्यांच्यासोबत काम केले होते.
हेही वाचा - Emmy Awards 2021 : नवाजुद्दीन सिद्दीकी, वीर दास आणि सुष्मिता सेन यांना नॉमिनेशन