लॉस एंजेलिस - बॉलिवूड अभिनेत्री प्रियाका चोप्राने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. यात ती लिक्विड साबणाने हात धूत एक गाणे गुणगुणताना दिसत आहे. हे गाणे तिचा पती निक जोनासच्या मदतीने तिने लिहिलंय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
''तुम्ही कुठेही असा, कसेही असा हात धुवत रहा. हे एक सोपे काम आहे. चला हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी करा. जिथेही असाल हात धुवा,'' असा या गाण्याचा मराठी अर्थ आहे.
या व्हिडिओत कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी पाण्याचा नळ चालू बंद करीत आपल्या परिवाराच्या भल्यासाठी हात सतत धुवत राहण्याचे आवाहन करताना दिसत आहे. आपण मिळून या संकटाचा मुकाबला करू शकतो हा विश्वास ती फॅन्सना देत आहे.
पती निक जोनास, बहिण परिणीती चोप्रा आणि अमिताभ बच्चन अशा दिग्गजांना हॅशटॅगसेफहँड्स चॅलेंज देताना प्रियंकाने लिहिलंय, ''मी डॉक्टर टेड्रेसच्या हॅशटॅगसेफहँड्स चॅलेंजचा स्वीकार करीत आहे. काल आयजी लाईव्ह चॅटमधील महत्त्वपूर्ण गोष्टींमध्ये हात स्वच्छ धुण्याचे महत्त्व अधोरेखीत होते. एक साधी गोष्ट आहे, ज्यामुळे आयुष्य वाचवण्यात मदत होते.''
प्रियांका पुढे लिहिते, ''हे सांगण्यासाठीच हे गाणे आहे. आपला हात २० सेकंद धुवा. या गाण्याचा सहलेखक निक जोनास आहे.''