मुंबई - अनुष्का शर्माने 'पाताल लोक' या मालितेून वेब-सिरीजच्या जगात निर्माती म्हणून पदार्पण केले आहे. १५ मे रोजी प्राईम व्हिडिओवर रिलीज झालेल्या या सिरीजला भरपूर प्रतिसाद मिळत असला तरीही काही लोकांचा विरोध दिसून येत आहे. या मालिकेत अनेक राजकीय प्रसंग आहेत. याबाबतकाही लोक नाराज झाले आहेत.
या मालिकेतील एका प्रसंगाबाबत नेटिझन्स विरोध करीत असून हा सीन काढून टाकण्यात यावा, अशी मागणी अनुष्का शर्माकडे केली जात आहे. इतकेच नाहीतर, याबद्दल अनुष्काने माफी मागावी, अशीही मागणी नेटकरी करताना दिसतात. या प्रसंगामुळे नॉर्थ-ईस्टकडील प्रेक्षकांना आपला नाराजी व्यक्त केली आहे.
-
Unsubscribe @PrimeVideo for showing such anti hindu web series. #patalok https://t.co/RFxyTETy5h
— Parimal (@parimal_05) May 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Unsubscribe @PrimeVideo for showing such anti hindu web series. #patalok https://t.co/RFxyTETy5h
— Parimal (@parimal_05) May 17, 2020Unsubscribe @PrimeVideo for showing such anti hindu web series. #patalok https://t.co/RFxyTETy5h
— Parimal (@parimal_05) May 17, 2020
या मालिकेतील काही प्रसंग धार्मिक भावना दुखावणारे असल्याचे टीका करणारे नेटकरी सोशल मीडियावर सांगत आहेत. असे असले तरी, मालिका लोकप्रियतेच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. मालिकेचे कौतुक करणाऱ्या भरपूर प्रतिक्रिया सामान्य प्रेक्षकांपासून ते सेलेब्सपर्यंत मिळत आहेत.