मुंबई - बॉलिवूड आयटम गर्ल नोरा फतेहीचे इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट झाल्याची बातमी शुक्रवारी आली. आता शनिवारी अभिनेत्रीचे इन्स्टा अकाउंट रिस्टोअर करण्यात आले आहे. अभिनेत्रीचे इन्स्टा अकाउंट न दिसल्याने चाहत्यांची अस्वस्थता वाढली होती. आता पुन्हा एकदा नोराच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. याचे कारण खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियावर येऊन सांगितले आहे.
![नोरा फतेही इंस्टा स्टोरी पोस्ट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14377983_t.png)
नोरा फतेहीने इंस्टा स्टोरीमध्ये लिहिले की, 'माफ करा मित्रांनो, माझे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सकाळपासून कोणीतरी माझे अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. माझी समस्या लवकर सोडवल्याबद्दल इन्स्टाग्राम टीमचे आभार.' नोराचे इंस्टाग्राम रिस्टोअर झाल्याने चाहते खूप खूश झाले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
नोरा फतेहीचे इंस्टाग्रामवर 37 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. याच कारणामुळे नोराला इन्स्टा क्वीन असेही म्हटले जाते. सध्या अभिनेत्री दुबईत सुट्टी घालवत आहे. नोराने तिच्या शेवटच्या पोस्टमध्ये एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती सिंहासोबत दिसत होती. नोरा तिच्या आयटम नंबरसाठी तसेच तिच्या बोल्ड आणि स्टनिंग फोटोंसाठी इंस्टाग्रामवर बरीच प्रसिध्द आहे.
हेही वाचा - रणबीर कपूरला आलिया भट्टकडून मिळाला 'बेस्ट बॉयफ्रेंड'चा टॅग, जाणून घ्या का?