मुंबई - जगभरात सध्या कोरोना व्हायरसची दहशत पसरली आहे. या व्हायरसमुळे आत्तापर्यंत बरेच लोक मृत्यूमुखी पडले आहेत. भारतातही या व्हायरसची भीती पसरली आहे. कलाविश्वालाही या व्हायरसचा फटका बसला आहे. २ एप्रिलला जेम्स बॉन्डचा 'नो टाईम टू डाय' हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोना व्हायरस झपाट्याने पसरत असल्यामुळे सुरक्षिततेसाठी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबली आहे.
होय, 'नो टाईम टू डाय' हा चित्रपट आता सात महिन्यानंतर म्हणजे १२ नोव्हेंबर २०२० ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. जेम्स बॉन्डने ट्विटरद्वारे याबाबत माहिती शेअर केली आहे.
-
MGM, Universal and Bond producers, Michael G. Wilson and Barbara Broccoli, announced today that after careful consideration and thorough evaluation of the global theatrical marketplace, the release of NO TIME TO DIE will be postponed until November 2020. pic.twitter.com/a9h1RP5OKd
— James Bond (@007) March 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">MGM, Universal and Bond producers, Michael G. Wilson and Barbara Broccoli, announced today that after careful consideration and thorough evaluation of the global theatrical marketplace, the release of NO TIME TO DIE will be postponed until November 2020. pic.twitter.com/a9h1RP5OKd
— James Bond (@007) March 4, 2020MGM, Universal and Bond producers, Michael G. Wilson and Barbara Broccoli, announced today that after careful consideration and thorough evaluation of the global theatrical marketplace, the release of NO TIME TO DIE will be postponed until November 2020. pic.twitter.com/a9h1RP5OKd
— James Bond (@007) March 4, 2020
काही दिवसांपूर्वीच चित्रपटाची नवी तारीख जाहीर करण्यात आली होती. सुरुवातीला ३ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाला संपूर्ण आठवड्याचा फायदा व्हावा यासाठी २ एप्रिल तारीख जाहीर झाली होती. मात्र, आता पुन्हा या चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये विलंब लागणार आहे. त्यामुळे जेम्स बॉन्डच्या चाहत्यांमध्येही नाराजी पसरली आहे. जेम्स बॉन्डची भूमिका पाहण्यासाठी आता चाहत्यांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
डॅनियल क्रेगने २००६ साली 'कसिनो रॉयल' मधून 'जेम्स बॉन्ड'च्या सीरिजमध्ये एन्ट्री केली होती. त्यानंतर त्याने 'क्वांटम ऑफ सोलेस', 'स्कायफॉल' आणि 'स्पेक्ट्रम' यामध्ये जेम्स बॉन्डची भूमिका साकारली होती. 'स्कायफॉल' या सीरिजने ब्रिटनच्या बॉक्स ऑफिसवर बरेच विक्रम रचले होते.
हेही वाचा -'थलायवी'च्या भूमिकेसाठी कंगनाने वाढवले २० किलो वजन, पाहा फोटो
कॅरी फुकुनागा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहेत. जेम्स बॉन्डसोबतच बॉन्ड गर्ल्सचीही चर्चा पाहायला मिळते. 'नो टाइम टू डाय' मध्ये अना दे अमर्स ही बॉन्ड गर्ल बनणार आहे. तर, ऑस्कर विजेता अभिनेता रामी मालेक हा विलनच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय, दाली बेनसाला आणि लॅशा लिंच या कलाकारांची देखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा -''मी पाच वर्षात एकही फिल्म बनवली नाही आणि रोहितने कमवले २००० कोटी''