ETV Bharat / sitara

प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी येताहेत नवीन, फ्रेश, अनोख्या ऑन-स्क्रीन जोड्या! - बॉलीवूड हिट जोड्या न्यूज

पूर्वी एखादा चित्रपट हिट झाल्यावर त्यातील कलाकार-जोडीला घेऊन अनेक चित्रपट बनायचे. आजच्या बदललेल्या काळात प्रेक्षकांना सतत काहीतरी नवीन हवं असतं. त्यामुळे बॉलिवूडकरांनी लोकप्रिय कलाकारांच्या नवनवीन जोड्या बनवून प्रेक्षकांना आपलंसं करण्याचा चंग बांधलाय. गर्दीला सिनेमा हॉल्समध्ये खेचून आणण्यासाठी या नवीन जोड्या हातभार लावतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.

बॉलीवूड हिट जोड्या न्यूज
बॉलीवूड हिट जोड्या न्यूज
author img

By

Published : Jan 17, 2021, 5:55 PM IST

मुंबई - पूर्वी एखादा चित्रपट हिट झाल्यावर त्यातील कलाकार-जोडीला घेऊन अनेक चित्रपट बनायचे. राज कपूर-नर्गिस, दिलीप कुमार-वैजयंतीमाला, राजेश खन्ना-शर्मिला टागोर व मुमताज, धर्मेंद्र-हेमा मालिनी, अमिताभ बच्चन-रेखा, शाहरुख खान-काजोल अशा अनेक जोड्या अनेक चित्रपटांतून दिसल्या व प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले. आजचा काळ बदललाय. प्रेक्षकांना सतत काहीतरी नवीन हवं असतं आणि मागणी तसा पुरवठा करणाऱ्या बॉलिवूडकरांनी लोकप्रिय कलाकारांच्या नवनवीन जोड्या बनवून प्रेक्षकांना आपलंसं करण्याचा चंग बांधलाय.

कलाकारांमधील ऑन-स्क्रीन केमिस्ट्री

पारंपरिकपणे, कलाकारांमधील ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांसाठी सर्वात मोठं रेखांकन आहे. मुंबईतील मराठा मंदिरातील १००० आठवड्यांच्या वर चालणाऱ्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ ने प्रेम आणि उन्माद एकत्र करणे याचे कारण म्हणजे शाहरुख खान आणि काजोल मधील शानदार केमिस्ट्री. अलीकडेच रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांनी रामलीला आणि बाजीराव मस्तानी सारख्या चित्रपटात त्यांच्या ‘हॉट’ केमिस्ट्रीने प्रेक्षकांचे मन जिंकले. त्यामुळेच आता सिनेनिर्माते नाविन्यपूर्ण स्क्रीन-जोड्या बनविण्याच्या प्रयत्नात आहेत. २०२१ मधे रिलीज होणार्‍या सिनेमांमध्ये अनेक नवीन जोड्या दिसणार असून त्यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना चित्रपटगृहांत मोठ्या संख्येने खेचून आणेल, असं भाकीत केलं जातंय.

हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण : नुकतेच दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद ने त्याच्या पुढील चित्रपटासाठी दोन सुपरस्टार्सना निवडले आहे. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण. ही नवीन रोमँटिक जोडी ॲक्शन चित्रपटात रोमान्स करताना दिसेल. सिद्धार्थ व हृतिक, या दिग्दर्शक-अभिनेता, जोडीने याआधी ‘बँग बँग‘ आणि ‘वॉर’ सारखे चित्रपट दिले आहेत जे सुपरहिट ठरले. हृतिक व दीपिका चा ‘केक’ खातानाच्या व्हिडीओला समाज माध्यमांवर मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता, त्यांच्या चित्रपटाला किती प्रचंड रिस्पॉन्स मिळेल याचा अंदाज येतोय. एखादा इंस्टाग्राम व्हिडिओ इतका मोहिनी घालू शकला असेल तर चित्रपटामध्ये काय आहे, याची कल्पना करा.

हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण
हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण

हेही वाचा - कैलास खेर म्हणतोय "जनता के सेवक है हम"!

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे : विजय देवरकोंडा हा दक्षिणेतील सुपरस्टार आहे व ‘फायटर’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. बॉलिवूडची चुलबुली हिरॉईन म्हणून ओळखली जाणारी अनन्या पांडे त्याच्यासोबत दिसेल. दोघांची केमिस्ट्री बघता रुपेरी पडद्यावर आग लागण्याची शक्यता आहे. दोघांचेही मोठ्या प्रमाणात चाहते असून त्याचा चित्रपटाला फायदाच होईल. ‘फाइटर’ मधील ‘देवरकोंडा-पांडे’ ही एक वेगळी जोडी प्रेक्षकांना भावेल अशी अपेक्षा निर्माते, दिग्दर्शक करीत असणार.

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे
विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे
राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर : राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर हे दोघेही आशयघन चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु ‘बधाई दो’ या चित्रपटासाठी ते दोघे पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. ‘लॅव्हेंडर मॅरेज’ असे या चित्रपटाचे वर्णन केले जात असून आयुष्मान खुराना, सनाया मल्होत्रा, नीना गुप्ता आणि गजराज राव यांच्या तगड्या अभिनयाने नटलेल्या ‘बधाई हो’ या चित्रपटाचा ‘बधाई दो’ हा रिमेक आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता राजकुमार राव ‘बधाई दो’ सध्या भूमी पेडणेकर सोबत राजधानी दिल्लीत शूटिंग करतोय व याचवर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘लिव्ह-इन’ रिलेशनशिपवर याचे कथानक बेतलेले असून राव-पेडणेकर जोडी काय कमाल करतेय याकडे बॉलिवूडकरांचे लक्ष असेल.
राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर
राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर : फॅन ते प्रियकर असा प्रवास केलाय आलिया भटने, रणबीर कपूर सोबत. अयान मुखर्जीच्या ‘ब्रम्हास्त्र’ च्या वेळी, दोनेक वर्षांपूर्वी, दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले व आता लग्नही करणार आहेत. रणबीर व आलिया या दोघांनाही लग्नाची घाई असली तरी ‘ब्रम्हास्त्र‘ लवकर प्रदर्शित व्हावा ही प्रार्थनाही दोघे करताहेत. रिअल-लाइफ कपलच्या केमिस्ट्रीमध्ये ते कमी पडत नाहीत व दोघेही प्रेक्षकांचे लाडके कलाकार आहेत. त्यांचा पडद्यावरील प्रणयही सुपरहिरो चित्रपट ‘ब्रम्हास्त्र‘ विषयीची एक भुरळ पाडणारी गोष्ट आहे.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर
मृणाल ठाकूर आणि शाहिद कपूर : मराठमोळी मृणाल ठाकूरची बॉलिवूडमधील घोडदौड कौतुकास्पद आहे. ती अजून एक मोठा हिंदी चित्रपट, जर्सी, करीत असून तिची जोडी शाहिद कपूर सोबत जमली आहे. जर्सीचे कथानक क्रिकेटवर आधारित असून तो त्याच नावाच्या तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. जर्सी कदाचित एक प्रेमकथा नसली तरी विवाहातील प्रेम प्रस्थापित करण्यासाठी आणि तिच्यातील नाती बदलत असताना तिचे अर्थ कसे बदलतात, यासंबंधीच्या कथेत मृणाल-शाहिदची केमिस्ट्री कशी असेल याबद्दल दोघांच्याही फॅन्समध्ये चर्चा सुरू आहे. कपूर आणि ठाकूरची जोडी ‘जर्सी’ मधून काव्यपुर्ण प्रणयरम्य कथन रंगवतील हे निश्चित. गेल्या वर्षी कोविडमुळे याच्या चित्रीकरणात व्यत्यय आला होता. या दिवाळीत ‘जर्सी’ प्रेक्षकांना सामोरा जाईल.
मृणाल ठाकूर आणि शाहिद कपूर
मृणाल ठाकूर आणि शाहिद कपूर
गेले वर्षभर चित्रपटगृहे बंद असल्याकारणाने प्रेक्षकांची थिएटरमध्ये येण्याची सवय तुटली, असा संशय आल्यामुळे त्यांना पुन्हा सिनेमा हॉल्समध्ये खेचून आणण्यासाठी या नवीन जोड्या हातभार लावतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.

हेही वाचा - फॅशनिस्टा सई ताम्हणकरचे आकर्षक ‘सारी-लूक्स’!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.