ETV Bharat / sitara

'लग्न झालेल्या व्यक्तीच्या प्रेमात पडू नका', नीना गुप्तांनी दिला सल्ला - Neena Gupta relationships

नीना यांनी 'सच कहुँ तो', असे कॅप्शन देऊन हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Neena Gupta advice that dont involve with Married Person, Neena Gupta latest video, Neena Gupta latest news, Neena Gupta in news, Neena Gupta advice, Neena Gupta relationships, Neena Gupta - vivian Richards
'लग्न झालेल्या व्यक्तीच्या प्रेमात पडू नका', नीना गुप्तांनी दिला सल्ला
author img

By

Published : Mar 3, 2020, 12:54 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या आपल्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांनी सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओद्वारे त्यांनी 'लग्न झालेल्या व्यक्तीच्या प्रेमात पडू नका', असा सल्ला तरुणींना दिला आहे. स्वत:चे उदाहरण देत त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

नीना गुप्ता या व्हिडिओत सांगतात, की 'तुम्हाला एखादी लग्न झालेली व्यक्ती म्हणते की त्याचे आता त्याच्या पत्नीवर प्रेम नाही. त्यानंतर तो तुमच्या जवळ येऊ लागतो. तुमच्याही मनात त्याच्याविषयी ओढ निर्माण होते. तुम्ही एकत्र वेळ घालवू लागता. मग त्याच्याशी लग्न व्हावे, अशी तुमची इच्छा वाढते. मात्र, तो त्याच्या पत्नीला घटस्फोट देऊन तुमच्याशी लग्न करण्यास तयार नसतो. ज्याचा त्रास शेवटी तुम्हालाच होतो. त्यामुळे 'लग्न झालेल्या व्यक्तीच्या प्रेमात पडू नका', असा सल्ला नीना गुप्ता यांनी दिला आहे.

हेही वाचा -काजोलची ह्रदयस्पर्शी 'देवी' शॉर्ट फिल्म झाली रिलीज

नीना यांनी 'सच कहुँ तो', असे कॅप्शन देऊन हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांच्या हिमतीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. नीना यांचे वैयक्तिक आयुष्य बऱ्याच गोष्टींनी रंगलेले आहे. त्यांचे क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्डसोबत असलेले अफेअर एकेकाळी बरेच गाजले होते. व्हिव्हियन यांच्यासोबत नात्यात असताना त्या गरोदर राहिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी कुमारी माता बनण्याचा निर्णय घेतला होता. त्यांची मुलगी मसाबा सध्या फॅशन क्षेत्रातील सुप्रिसद्ध डिझायनर आहे.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं, तर नीना आयुष्मान खुरानाच्या 'बधाई हो' चित्रपटानंतर चांगल्याच प्रसिद्धीझोतात आल्या आहेत. त्याची या चित्रपटात मुख्य भूमिका होती. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'पंगा' आणि 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली आहे.

हेही वाचा -क्रितीच्या आयुष्यात खुललं प्रेम?, 'या' फोटोची होतेय चर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.