मुंबई - भारताच्या मंगल मोहिमेची खरी कथा मांडणारा 'मिशन मंगल' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा विषय घेऊन येणाऱ्या या चित्रपटाची प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत आहेत. अशात आता या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
या पोस्टरमध्ये अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, किर्ती कुल्हारी, निथ्या मेनन आणि शर्मन जोशी यांची झलक पाहायला मिळत आहे. आकाशाला सीमा नसतात, असं या पोस्टरवर लिहिलं गेलं आहे. या चित्रपटातून स्त्री शक्तीची कथा जगासमोर मांडली जाणार आहे.
-
Ye kahaani hai ordinary logon ke ek extraordinary dream ki. On 15 Aug witness the true story of India's #SpaceMission to Mars #MissionMangal @AkshayKumar @vidya_balan @taapsee @TheSharmanJoshi @menennithya @IamKirtiKulhari @Jaganshakti @FoxStarHindi #HopePictures @isro pic.twitter.com/DT8cq8QoPC
— Baby Bedi (@sonakshisinha) July 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Ye kahaani hai ordinary logon ke ek extraordinary dream ki. On 15 Aug witness the true story of India's #SpaceMission to Mars #MissionMangal @AkshayKumar @vidya_balan @taapsee @TheSharmanJoshi @menennithya @IamKirtiKulhari @Jaganshakti @FoxStarHindi #HopePictures @isro pic.twitter.com/DT8cq8QoPC
— Baby Bedi (@sonakshisinha) July 4, 2019Ye kahaani hai ordinary logon ke ek extraordinary dream ki. On 15 Aug witness the true story of India's #SpaceMission to Mars #MissionMangal @AkshayKumar @vidya_balan @taapsee @TheSharmanJoshi @menennithya @IamKirtiKulhari @Jaganshakti @FoxStarHindi #HopePictures @isro pic.twitter.com/DT8cq8QoPC
— Baby Bedi (@sonakshisinha) July 4, 2019
ही कहाणी आहे, सामान्य लोकांच्या असामान्य स्वप्नांची, असं म्हणत सोनाक्षीने हे पोस्टर शेअर केलं आहे. दरम्यान आर. बाल्की आणि जगन शक्ती दिग्दर्शित हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २०१९ ला प्रदर्शित होणार आहे. तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत आहेत.