मुंबई - अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि सलमान खान यांची जोडी लवकरच 'भारत' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे त्यांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमान आणि कॅटरिनाची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच खास राहिली आहे.
मात्र, सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असणारी आणि अनेकांचे फोटो आणि पोस्ट लाईक करणारी कॅटरिना भाईजानचे फोटो कधीच लाईक का करत नाही? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. हाच प्रश्न एका पत्रकाराने जिंदा गाण्याच्या लाँचिंगवेळी कॅटरिनाला विचारला.
यावर उत्तर देताना कॅट म्हणाली, की असं काहीही मी कधी ठरवून केलं नाही. पण आता जर तुम्ही असं म्हणत असाल तर मी नक्कीच या गोष्टीकडे विशेष लक्ष देईल. तर कॅटरिनाचं उत्तर संपताच हा प्रश्न कोणी विचारला आणि कोणाची पोस्ट कॅटरिनाने लाईक केली, असा सवाल सलमानने हसत हसत विचारला. एकंदरीतच मस्तीच्या वातावरणात या गाण्याचा लाँचिंग सोहळा पार पडला.