मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा अनेकदा सोशल मीडियावर सक्रिय असते. सारा तिचे ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांसोबत शेअर करत असते. साराच्या फोटोवर चाहते काही मिनिटांत लाईक्सचा वर्षाव करायला सुरुवात करीत असतात. आता जो फोटो साराने शेअर केलाय त्यालाही उदंड प्रतिसाद मिळाला असून फोटोला लाईक्स करणाऱ्यांमध्ये अभिनेता कार्तिक आर्यनही सामील झाला आहे.
![सारा तेंडूलकर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13340784_2.jpg)
साराने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सारा खूपच सौंदर्यवान दिसत आहे. साराच्या या फोटोला आतापर्यंत साडेतीन लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर कार्तिक आर्यन सारख्या अभिनेताही लाईक्स करणाऱ्यांमध्ये सामील आहे.
या फोटोवर दोन हजारांहून अधिक कॉमेंट्सदेखील आल्या आहेत. कार्तिक आर्यनने या फोटोला लाईक कमेंट केली आहे. साराचे इन्स्टाग्रामवर 14 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सारा तिचा सुंदर ड्रेस आणि कधीकधी तिच्या वर्कआउट स्टेशनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
![सारा तेंडूलकर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13340784_3.jpg)
सारा कुटुंबासह मुंबईत राहते. सध्या ती लंडनमधील महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेत आहे. साराने आपले शालेय शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून केले आहे.
अशी अफवा आहे की सारा आणि क्रिकेटर शुभमन गिल एकमेकांना डेट करत आहेत, परंतु या गोष्टीला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
हेही वाचा - 'अंतिम द फायनल ट्रुथ'मधील नव्या लूकसह सलमानने जाहीर केली रिलीजची तारीख