मुंबई - कोरोनाच्या आधीपासून बनत असलेल्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाने अखेर चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. होय, या दीर्घकालीन चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. करण जोहरने स्वत: सोशल मीडियावर येऊन आपल्या चाहत्यांना चित्रपटाशी संबंधित एक मोठी बातमी दिली आहे. आता आपण इतकंच म्हणू शकतो की, आता रणबीर-आलियाच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे.
खरंतर, करण जोहरने शनिवारी त्याच्या इंस्टाग्रामवर येऊन 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाशी संबंधित एक पोस्ट केली. करणने या पोस्टमध्ये सांगितले आहे की, तो १५ डिसेंबरला दिल्लीत या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करणार आहे.
यासोबतच करण या चित्रपटातील रणबीर कपूरच्या 'शिवा' या व्यक्तिरेखेवरूनही पडदा उचलणार आहे. चित्रपटाशी संबंधित ही पहिली अधिकृत घोषणा आहे, आत्तापर्यंत चाहते हा चित्रपट कधी तयार होईल याची वाट पाहत होते. तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि बंगाली भाषांमध्येही मोशन पोस्टर डब करण्यात आले आहे.
चित्रपटाची स्टारकास्ट
'ब्रह्मास्त्र' हा सुपरहिरो चित्रपट असून, यामध्ये रणबीर-आलियाशिवाय अमिताभ बच्चन, डिंपल कपाडिया, शाहरुख खान, मौनी रॉय आणि दक्षिणेतील अभिनेता नागार्जुन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
हा चित्रपट तीन भागात बनवला जाणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन अंतर्गत बनवण्यात आला आहे. हा चित्रपट अयान मुखर्जीने दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे.
हेही वाचा - विकी कौशलला परदेशी मेव्हणीने अशी लावली हळद, पाहा व्हायरल फोटो