शिमला : कंगना रणौतचा कोरोना अहवाल मंगळवारी रात्री उशीराने प्राप्त झाला. यामध्ये ती कोरोना निगेटिव्ह असल्याचे समजले आहे. त्यामुळे आज तिचे महाराष्ट्रात येणे निश्चित असल्याचे म्हटले जात आहे.
-
#WATCH: Actor Kangana Ranaut at Mohali International Airport, she will be leaving for Mumbai shortly. pic.twitter.com/nacEgRTyr5
— ANI (@ANI) September 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH: Actor Kangana Ranaut at Mohali International Airport, she will be leaving for Mumbai shortly. pic.twitter.com/nacEgRTyr5
— ANI (@ANI) September 9, 2020#WATCH: Actor Kangana Ranaut at Mohali International Airport, she will be leaving for Mumbai shortly. pic.twitter.com/nacEgRTyr5
— ANI (@ANI) September 9, 2020
मंगळवारी मनालीमध्ये चाचणीसाठी जमा केलेला कंगनाचा नमुना फेल गेल्यामुळे मंडीमध्ये पुन्हा तिने कोरोना चाचणी दिली होती. या चाचणीचा अहवाल रात्रीपर्यंत मिळाला नव्हता. त्यामुळे आज तिला मुंबईला येता येईल की नाही याबाबत साशंकता होती. मात्र रात्री उशीरा तिचा अहवाल प्राप्त झाला, आणि तो निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. मंडीचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र शर्मा यांनी कोरोना अहवालाबाबत माहिती दिली.
दरम्यान कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर कंगना रणौत मंडीहून चंदीगड विमानतळाकडे रवाना झाली आहे. तेथून विमानाने ती आज मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
"जय महाराष्ट्र जय शिवाजी"; कंगनाचे मुंबईत येण्यापूर्वी ट्विट..
कंगना रणौतने बुधवारी सकाळी ट्विटरवरून आपण मुंबईत येणार असल्याचे सांगितले. "मी झाशीच्या राणीचे शौर्य आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडले. तरीही मला माझ्याच महाराष्ट्रात येण्यापासून अडवण्यात येत आहे, हे दुःखद आहे. मात्र मी राणी लक्ष्मीबाईंनी दाखवलेल्या मार्गावरच चालत राहणार, आणि चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवणार; जय महाराष्ट्र, जय शिवाजी!" अशा आशयाचे ट्विट तिने केले आहे.
-
रानी लक्ष्मीबाई के साहस,शौर्य और बलिदान को मैंने फ़िल्म के जरिए जिया है। दुख की बात यह है मुझे मेरे ही महाराष्ट्रा में आने से रोका जा रहा है मै रानी लक्ष्मीबाई के पद चिन्हों पर चलूँगी ना डरूंगी, ना झुकूँगी। गलत के ख़िलाफ़ मुख़र होकर आवाज़ उठाती रहूंगी, जय महाराष्ट्र, जय शिवाजी🙏
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">रानी लक्ष्मीबाई के साहस,शौर्य और बलिदान को मैंने फ़िल्म के जरिए जिया है। दुख की बात यह है मुझे मेरे ही महाराष्ट्रा में आने से रोका जा रहा है मै रानी लक्ष्मीबाई के पद चिन्हों पर चलूँगी ना डरूंगी, ना झुकूँगी। गलत के ख़िलाफ़ मुख़र होकर आवाज़ उठाती रहूंगी, जय महाराष्ट्र, जय शिवाजी🙏
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020रानी लक्ष्मीबाई के साहस,शौर्य और बलिदान को मैंने फ़िल्म के जरिए जिया है। दुख की बात यह है मुझे मेरे ही महाराष्ट्रा में आने से रोका जा रहा है मै रानी लक्ष्मीबाई के पद चिन्हों पर चलूँगी ना डरूंगी, ना झुकूँगी। गलत के ख़िलाफ़ मुख़र होकर आवाज़ उठाती रहूंगी, जय महाराष्ट्र, जय शिवाजी🙏
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
हेही वाचा : रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी