ETV Bharat / sitara

"गर्लफ्रेंडला थप्पड मारु शकत नसाल तर हे कसले प्रेम"

जर तुम्ही प्रेमात प्रामाणिक असाल तर एकमेकांना थप्पड मारण्याचे स्वातंत्र्य आहे, असे मत कबीर सिंह चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा
author img

By

Published : Jul 8, 2019, 3:51 PM IST

मुंबई - 'कबीर सिंह' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करीत असताना दिसतोय. मात्र त्याच्यावर टीका करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा हे सध्या त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहेत. त्यांनी सिने समिक्षिका अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, ''जेव्हा तुम्ही कोणा पुरुषावर किंवा स्त्रीवर खूप खोलवर प्रेम करीत असाल तर यात भरपूर प्रामाणिकता असते. जर तुम्हाला फिजिकल डेमॉन्स्ट्रेशनचे स्वातंत्र्य नसेल किंवा एकमेकांना झापड मारण्याचे स्वातंत्र्य नसेल तर मला वाटत नाही की त्यांच्यामध्ये काही आहे.''

  • Again..I had no problem with the film..but saying that if u r not able to slap each other there’s no love in an interview where millions are watching is not cool!! Even a woman slapping a man is a big NO!! U wanna call is feminism...so be it!! Am a proud FEMINIST!!

    — Gutta Jwala (@Guttajwala) July 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या भूमिका असलेल्या 'कबीर सिंह'मध्ये काही असे सीन्स आहेत ज्यावर आक्षेप घेतला जातो. एका सीनमध्ये हिरो गर्लफ्रेंडला थप्पड मारतो आणि ती यावर काहीही प्रतिक्रिया देत नाही. हिरोचे हे वागणे सामान्य असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न होतोय, असे काही समिक्षक म्हणतात. यावर संदीप रेड्डी म्हणतात, की अर्जुन रेड्डी चित्रपटाच्यावेळीदेखील अशीच टीका झाली होती, पण हे फारच अजब आहे.

संदीप वांगा यांनी टीका करणाऱ्यांना उत्तर देताना म्हटले की, जे लोक टीका करीत आहेत त्यांनी कधी प्रेम केले नाही किंवा योग्य प्रकारे केले नाही. मुलगी त्याला विनाकारण थप्पड मारते पण कबीरकडे थप्पड मारण्यासाठी कारण आहे. जर तुम्ही गर्लफ्रेंडला स्पर्श करु शकत नाही, थप्पडमारु शकत नाही, चुंबन घेऊ शकत नाही, तर मला नाही वाटत तुमच्यात काही इमोशन्स आहेत.

संदीप रेड्डी यांच्या मुलाखतीनंतर भूरपूर हंगामा झाला. दाक्षिणात्य सिनेतारका सामंथा आणि बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा यांच्यासह असंख्य कलाकारांनीही टीकेची झोड उठवली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.