मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि मौनी रॉय यांनी शेअर केलेल्या अलिकडील फोटोमुळे चाहते दंग झाले आहेत. जान्हावीने एका मॅगझीन फोटोशूटसाठी केलेला जुना व्हिडिओ शेअर केलाय तर मौनीच्या लेटेस्ट फोटोमध्ये तिचे साडी प्रेम दिसून येते.
मंगळवारी, जान्हवीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये ती सिक्विन बिकिनी टॉप आणि स्लिट स्कर्ट घातलेली दिसत आहे. पोशाखानुसार, व्हिडिओ जान्हवीने ट्रॅव्हल आणि लेझर मॅगझिनसाठी फोटोशूट केल्याचा दिसत आहे. हे फोटोशूट तिने या वर्षी मे महिन्यात केले होते. जान्हवीने मालदीवमध्ये मॅगझिनसाठी शुटिंग केले. पोस्टला दिलेल्या शीर्षकावरुन लक्षात येते की ती अद्यापही सुट्टीच्याच गोष्टींमध्ये रमली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
आणखी एक अभिनेत्री जिने सिक्विन आउटफिटची निवड केली आहे ती आहे मौनी रॉय. जान्हवीच्या उलट तिला लुक पारंपारिक आहे. तिने सुंदर साडी नेसली असून याला तिने मस्त कॅप्शन दिलंय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, कामाचा विचार करता मौनी रॉयने आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची भूमिका असलेल्या ब्रह्मास्त्र चित्रपटात काम केले असून याच्या रिलीजची ती प्रतीक्षा करीत आहे. यात ती खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
जान्हवीचा आगामी सिनेमा आहे 'दोस्ताना 2'. तिने या वर्षाच्या सुरुवातीला तिच्या 'गुड लक जेरी' या चित्रपटाचे शूटही पूर्ण केले आहे. जान्हवी तिचे चित्रपट निर्माते वडील बोनी कपूर यांच्यासह मल्याळम थ्रिलर 'हेलन'च्या हिंदी रिमेकमध्येही झळकणार आहे.
हेही वाचा - कठीण क्षणातून उठणे यातच खरे धैर्य, पतीच्या सुटकेनंतर म्हणाली शिल्पा शेट्टी