मुंबई - सध्या कोरोनाची साथ सुरू असल्यामुळे बॉलिवूड सेलेब्रिटींनी होळीचा उत्सव साजरा करताना संयम पाळला आहे. उत्सवाच्या शुभेच्छा देत करिना कपूर आणि अक्षय कुमार यांनी रंगबिरंगी फोटो शेअर केले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सोमवारी करिनाने इन्स्टाग्रामवर तैमुरसोबतचा फोटो शेअर केला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'सुरक्षित राहा', असे सांगत होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आदल्या दिवशी करीनाने तिच्या एका गाण्याचा एक व्हिडिओही शेअर केला होता ज्यामध्ये अक्षय कुमारसोबत होळी साजरी करताना ती दिसली होती.
दरम्यान, अक्षयने आपली मुलगी नितारा भाटियासोबत एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात त्याने होळी सावध राहून साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हृतिक रोशन, करिश्मा कपूर, प्रियांका चोप्रा, रितेश आणि जेनेलिया देशमुख या बॉलिवूड सेलिब्रिटींनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - जान्हवी आणि खूशी बहिणी म्हणजे, ''तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना''!!