मुंबई - अनुराग कश्यपद्वारा दिग्दर्शित 'गँग्स ऑफ वासेपुर' सिनेमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. ज्यानंतर या सिनेमाचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला आला. कमाईसोबतच आता या सिनेमाने आपल्या नावावर एक नवा विक्रम रचला आहे.
द गार्डियनच्या २१ व्या शतकातील १०० सर्वोत्तम चित्रपटांच्या यादीत समावेश असणारा हा एकमेव भारतीय सिनेमा आहे. अनुरागने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याबद्दलची माहिती दिली आहे. या यादीत समावेश झाल्यानं अभिमान वाटत आहे. मात्र, ही माझी यादी नाही. यात कितीतरी चित्रपट माझ्या चित्रपटांच्या खाली आहेत, जे माझे आवडते आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दुसरी गोष्ट म्हणजे, माझ्या याच सिनेमानं माझं चित्रपट निर्मितीतील करिअर पूर्णपणे उद्धवस्त केलं आहे. या सिनेमानं एक निर्माता म्हणून माझ्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या. त्यामुळे, मी नेहमीच यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आणि एक दिवस हे नक्कीच शक्य होईल, असा विश्वासही अनुरागनं व्यक्त केला.